Join us  

अनुपम खेर यांनी या गोष्टीसाठी केले शाहरुख खानचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 5:47 PM

अनुपम खेर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांचे आणि शाहरुखचे नाते कसे आहे याविषयी त्यांनी सांगितले आहे. तसेच एका गोष्टीसाठी त्याचे कौतुक केले आहे.

ठळक मुद्देशाहरुखने एप्रिलमध्ये सांगितले आहे की, तो काही वेळ त्याच्या कुटुंबियांना देणार आहे. या निर्णयाविषयी अनुपम खेर यांनी त्याचे कौतुक केले आहे. अशाप्रकारच्या ब्रेकमध्ये स्वतःला तुम्हाला नव्याने शोधायची संधी मिळते असे असे मला वाटते. 

अनुपम खेर आणि शाहरुख खान यांनी ओह डार्लिंग ये है इंडिया, वीर-झारा, हॅपी न्यू ईयर, हे बेबी, पहेली, दिलवाले दुल्हनिया ले जाएँगे यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. दिलवाले दुल्हनिया ले जाएँगे या चित्रपटातील पित्या-मुलाची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. शाहरुख आणि अनुपम यांनी अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये काम केले असल्याने त्या दोघांची खऱ्या आयुष्यातील केमिस्ट्री कशी आहे हे जाणून घ्यायची लोकांची नेहमीच इच्छा असते. 

अनुपम खेर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांचे आणि शाहरुखचे नाते कसे आहे याविषयी त्यांनी सांगितले आहे. ते सांगतात, मी आणि शाहरुख सतत एकमेकांच्या संपर्कात असतो असे नाहीये. अनेकवेळा तर आमचे बोलणे सोशल मीडियाच्या माध्यमातूनच होते. 

शाहरुखने बॉलिवूडमधून काही महिने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने एप्रिलमध्ये सांगितले आहे की, तो काही वेळ त्याच्या कुटुंबियांना देणार आहे. या निर्णयाविषयी अनुपम खेर यांनी त्याचे कौतुक केले आहे. अशाप्रकारच्या ब्रेकमध्ये स्वतःला तुम्हाला नव्याने शोधायची संधी मिळते असे असे मला वाटते. 

रसिकांच्या मनात अनुपम खेर यांचं वेगळं स्थान आहे. 'सांराश' सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या अनुपम खेर यांचा जीवनप्रवास कधीच सोपा नव्हता. मात्र सारांश सिनेमानंतर आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि अभिनयामुळे त्यांनी रसिकांची मनं जिंकली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यांच्या आयुष्यात आलेले चढ-उतार प्रेक्षकांना आता त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये वाचता येणार आहेत. लेसन्स लाईफ टॉट मी, अननोव्हिंगली ही अनुपम यांची ऑटोबायोग्राफी ऑगस्ट महिन्यात लोकांच्या भेटीस येणार आहेत. 

अनुपम यांनी इन्स्टाग्रामद्वारे त्यांच्या ऑटोबायग्राफीविषयी त्यांच्या चाहत्यांना सांगितले होते. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले होते मी, माझे आयुष्य एका ओपन बुकसारखे आहे. एका छोट्याशा गावातील एका मुलाची ही कथा असून त्याने पाहिलेल्या स्वप्नांविषयी जाणून घेता येणार आहे. त्याची इच्छा, आकांक्षा, दुःख, यश, अपयश हे सगळे तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळणार आहे. 

टॅग्स :शाहरुख खानअनुपम खेर