Join us  

  तुम्ही मला ताकद दिलीत... ! आई कोरोनामुक्त झाल्यावर अनुपम खेर यांनी शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 10:14 AM

अनुपम यांची आई, भाऊ राजू खेर, वहिनी रीमा आणि पुतणी वृंदा यांना कोरोना झाला होता. यानंतर या सर्वांवर आठवडाभर उपचार सुरु होते.

ठळक मुद्देअनुपम खेर यांच्या आईची प्रकृती खराब होत होती. त्यांना भूक लागत नव्हती, अशक्तही वाटत होते.

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांची आई दुलारी खेर यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केलीये. अनुपम यांनी एका व्हिडीओद्वारे आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली. डॉक्टरांनी दुलारी यांना रूग्णालयातून सुट्टी दिली आहे. आता त्या घरीच आयसोलेशनमध्ये राहतील. गेल्या 12 जुलैला अनुपम खेर यांनी त्यांच्या कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी दिली होती. अनुपम यांची आई, भाऊ राजू खेर, वहिनी रीमा आणि पुतणी वृंदा यांना कोरोना झाला होता. यानंतर या सर्वांवर आठवडाभर उपचार सुरु होते. आता मात्र सर्वजण ठणठणीत बरे झाले आहेत.

अनुपम यांनी एक व्हिडीओ शेअर करत याबद्दल आनंद व्यक्त केला. सोबत डॉक्टर्स, मुंबई महापालिका आणि चाहत्यांचे आभार मानलेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, ‘माझ्या आईला वैद्यकीय मापदंडानुसार स्वस्थ घोषित करण्यात आले आहे. आता ती घरी होम क्वारंटाईनमध्ये राहिल. सुरक्षित राहा. कोरोना रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबापासून भावनिक अंतर राखून त्यांना वाळीत टाकू नका. डॉक्टर्स आणि बीएमसीचे कर्मचारी खरे हिरो आहेत.’ व्हिडिओमध्ये ते म्हणतात, ‘ ज्यांच्या घरात कोरोना रुग्ण आहेत, त्यांना एकाकी वाटते. मात्र ते एकटे नाहीत आम्ही त्यांच्या सोबत आहोत.

  अनुपम खेर यांच्या आईची प्रकृती खराब होत होती. त्यांना भूक लागत नव्हती, अशक्तही वाटत होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्यांची चाचणी करण्यात आली होती.त्यानंतर सीटी स्कॅन केले गेले त्यावेळी त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली होती. यानंतर अनुपम आणि त्याचा भाऊ राजू यांचीही कोरोना टेस्ट झाली. या अनुपम यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यांच्या भावाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर राजू खेर यांच्या कुटूंबाची कोरोना टेस्टही झाली होती. यात राजू यांची पत्नी आणि मुलगी यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते.

टॅग्स :अनुपम खेर