Join us  

'टीव्हीवर काम करणाऱ्यांना कमी समजू नको', रियाची मैत्रीण शिबानीला अंकिताचं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 9:45 AM

सुशांतच्या आठवणीत अंकिताने आतापर्यंत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र, काहीजणांनी अंकिता हे प्रसिद्धीसाठी करत असल्याचा आरोप केलाय.

सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे सुरूवातीपासूनच त्याच्या परिवाराला सपोर्ट करताना दिसली. सुशांतसाठीही तिने सतत न्यायाची मागणी केली. यात तिला सशांतचे मित्र आणि फॅन्सचीही साथ मिळत आहे. सुशांतच्या आठवणीत अंकिताने आतापर्यंत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र, काहीजणांनी अंकिता हे प्रसिद्धीसाठी करत असल्याचा आरोप केलाय.

नुकतीच अंकिता लोखंडेने एक लांबलचक पोस्ट शेअर केली होती. मुळात ते एक ओपन लेटर होतं, जे अंकिताने रिया चकवर्तीच्या अटकेनंतर लिहिलं होतं. त्यात तिने स्पष्ट केलं की, ती कधीच म्हणाली नाही की, सुशांतचा मर्डर झाला आणि त्याने आत्महत्या केली नाही. अशात अभिनेत्री शिबानी दांडेकरने रियाची बाजू घेत अंकितावर पलटवार केला होता. ती म्हणालली होती की, अंकिताला रियाबाबत बोलून दोन सेकंदात प्रसिद्धी हवी आहे. आता शिबानीच्या या आरोपावर अंकिताने उत्तर दिलंय.

आपल्या लेटरमध्ये अंकिताने तिच्या करिअरबाबत सांगितलं आहे. ती म्हणाली की, टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्यांना कधीही कमी समजू नये. यात तिने तिच्या पवित्र रिश्तापासून सुरू झालेल्या करिअरचा उल्लेख केलाय. ती पुढे म्हणाली की, कशाप्रकारे ती अर्चनाच्या भूमिकेशी जुळली आणि आजही जुळलेली आहे. नंतर तिने मणिकर्णिका आणि बागी ३ मध्ये काम करण्याची संधी मिळाल्याबाबत सांगितलं. शेवटी अंकिताने हेही सांगितलं की, कशाप्रकारे १७ वर्षांपासून मनोरंजन इंडस्ट्रीचा भाग आहे. 

अंकिताच्या या ओपन लेटरवर फॅन्स भरभरून रिअॅक्शन देत आहेत. सोबत उतरन आणि बिग ब़ॉस १३ मध्ये दिसलेल्या अभिनेत्री रश्मी देसाईने अंकिताला सपोर्टही केला आहे. सुशांत आणि अंकिताच्या फॅन्सने या ओपन लेटरचं कौतुक केलंय आणि फॅन्स कमेंट करून अंकिताला सपोर्ट करत आहेत. 

काय म्हणाली होती शिबानी ?

शिबानीने पुढे लिहिले, ‘या पुरूषप्रधान व्यवस्थेला ओळखण्याऐवजी अंकितासारख्या महिला या व्यवस्थेच्या लाटेवर स्वार होऊन स्वत:चा अजेंडा पुढे नेत आहे. सुशांत रियावर प्रेम करायचा, हे अंकिताने स्वीकारायला हवे.’

अंकिता काय म्हणाली होती?

अंकिताने मेसेजेमध्ये लिहिले की, 'मला पुन्हा पुन्हा मीडिया विचारते की, काय वाटतं हा मर्डर आहे की सुसाइड? त्यामुळे मी हे स्पष्ट करण्यासाठी सांगते की, मी कधीच म्हणाले नाही की, हा मर्डर आहे किंवा यासाठी एखादी विशेष व्यक्ती जबाबदार आहे. मी नेहमीच माझा दिवंगत मित्र सुशांत सिंह राजपूतच्या न्यायाची मागणी केली आहे. मी त्याच्या परिवारासोबत उभी आहे. आणि तपास यंत्रणेसमोर सत्य आलं पाहिजे'.

सुशांतच्या मेंटल हेल्थाबाबत माहीत  होतं

अंकिताने पुढे लिहिले की, 'डिअर हेटर्स, चला मान्य करू की, तुम्हाला तुमच्या मित्राबाबत सगळं काही नक्कीच माहीत असेल की, त्याच्या जीवनात आणि रिलेशनशिपमध्ये काय सुरू आहे. हे बघून चांगलं वाटलं की, अखेर तुम्ही झोपेतून उठलात. पण कदाचित तुम्ही आधी शुद्धीवर आले असता तर आपल्या मित्राला ड्रग्स न घेण्याचा सल्ला दिला असता. त्याना सुशांतच्या मेंटल हेल्थबाबत माहीत होतं कारण त्यांनी पब्लिकली सांगितलं होतं की, तो डिप्रेशनमध्ये होता'.

डिप्रेस्ड व्यक्तीला ड्रग्सची परवानगी द्यावी का?

अंकिताने प्रश्न विचारलाय की, 'काय तिने एका डिप्रेस्ड व्यक्तीला ड्रग्स सेवन करण्याची परवानगी द्यावी? त्याने त्याची मदत कशी होईल? त्याची कंडीशन त्या लेव्हलपर्यंत पोहोचली होती, ज्याने एक व्यक्ती सुशांतसारखा होईल. ती त्यावेळी सुशांतच्या सर्वात जवळ होती. एकीकडे ती सांगते की ती सुशांतच्या भल्यासाठी सर्व डॉक्टरांसोबत को-ऑर्डिनेट करत होती. दुसरीकडे ती सुशांतसाठी ड्रग्सचं को-ऑर्डिनेट करत होती'.

हे पण वाचा :

हे सारं पब्लिसिटीसाठी...! शिबानी दांडेकर बोलली, अंकिता लोखंडेच्या फॅन्सची सटकली

अंकिता लोखंडेने रियाला झापलं, म्हणाली - 'इतकं प्रेम होतं तरी ड्रग्स कसं घेऊ दिलं?'

सुशांतची विधवा संबोधल्यामुळे नाराज झाली अंकिता लोखंडे, सुनावले खडेबोल

टॅग्स :अंकिता लोखंडेशिबानी दांडेकरबॉलिवूड