Join us  

ज्या मालिकेने ओळख दिली, अंकिता लोखंडेने त्याच मालिकेची उडवली टर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 1:10 PM

टिकटॉक व्हिडीओ viral

ठळक मुद्देअंकिताने अलीकडे बॉयफ्रेन्ड विकी जैनसोबत टिकटॉकवर डेब्यू केला होता. 

टेलिव्हिजन इंडस्ट्री ते बॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे नुकतीच ‘बागी 3’ या चित्रपटामुळे चर्चेत होती. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आहे.  तिचा एक टिकटॉक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होतोय. होय, या व्हिडीओत अंकिता एका मालिकेची टर उडवताना दिसतेय. ही मालिका कोणती तर ‘पवित्र रिश्ता’.‘पवित्र रिश्ता’ याच मालिकेतून अंकिता लोखंडेने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या मालिकेने अंकिताला प्रचंड लोकप्रियता दिली. याच मालिकेच्या पुण्याईने ती घराघरात पोहोचली. पण आता याच मालिकेची तिने टर उडवली आहे. मालिकेची टर उडवणारा टिकटॉक व्हिडीओ तिने पोस्ट केला आहे.

 ‘भाभी के कमरे से देवर, जीजाजी के कमरे से साली और पडोसी के कमरे से ननद निकलथी थी और सीरियल का नाम था पवित्र रिश्ता...अच्छा हो गया बंद हो गई...’ असे ती व्हिडीओत म्हणते आणि जोरजोरात हसते.अंकिताने गमतीत हा व्हिडीओ बनवला असला तरी तूर्तास या व्हिडीओमुळे ती चांगलीच ट्रोल होतेय. होय, याच मालिकेने तुला ओळख दिली, हे विसरू नको, याची आठवण तिला अनेकजण करून देत आहेत.

‘पवित्र रिश्ता’ याच मालिकेच्या सेटवर अंकिता अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या प्रेमात पडली होती. यानंतर सुशांत व अंकिता दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होते. दोघेही लग्न करणार, अशीही चर्चा होती. पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअपनंतर अंकिता डिप्रेशनमध्ये गेली होती. पण आताश: ती यातून पूर्णपणे बाहेर पडली आहे. सध्या ती विकी जैनला डेट करतेय.

अंकिताने अलीकडे बॉयफ्रेन्ड विकी जैनसोबत टिकटॉकवर डेब्यू केला होता. सध्या अंकिता टिकटॉकवर व्हिडीओ बनवून आपला वेळ घालवत आहे.

टॅग्स :अंकिता लोखंडे