Join us  

अंकिता लोखंडेच्या बर्थ डे पार्टीचा व्हिडीओ पाहून संतापले सुशांतचे चाहते; म्हणाले, यार इस साल तो नहीं...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 12:34 PM

काल 19 डिसेंबरला अंकिता लोखंडेचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा झाला. यादरम्यान या पार्टीचा एक इनसाईड व्हिडीओ व्हायरल झाला आणि तो पाहून अंकिता जबरदस्त ट्रोल झाली.

ठळक मुद्देअंकिता लोखंडे विकी जैनसह असलेल्या रिलेशनशिपमुळे सध्या चर्चेत आहे. लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. अंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती.

काल 19 डिसेंबरला अंकिता लोखंडेचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा झाला. बर्थ डेची जंगी पार्टीही रंगली. अंकिताचा बॉयफ्रेन्ड विकी जैन व तिच्या मित्रमंडळींनी या पार्टीत अगदी धम्माल केली. यादरम्यान या पार्टीचा एक इनसाईड व्हिडीओ व्हायरल झाला आणि तो पाहून अंकिता जबरदस्त ट्रोल झाली. होय, या व्हिडीओत संदीप सिंग दिसला आणि युजर्सनी अंकिताला ट्रोल करायला सुरुवात केली. तुम्हाला आठवत असेलच की, सुशांत सिंग राजपूत प्रकरणात संदीप सिंगचे नाव आले होते.

संदीप हा सुशांतचा मित्र होता, तसेच अंकिताचाही तो मित्र आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर मात्र सोशल मीडियावर याच संदीपवर अनेक आरोप झाले होते. संदीपने पुराव्यांसोबत छेडछाड केल्याचा आरोपही सुशांतच्या चाहत्यांनी केला होता. अर्थात संदीपने हे आरोप नाकारले होते. हाच संदीप अंकिताच्या बर्थ डे पार्टीत दिसताच सुशांतच्या चाहत्यांचा संताप अनावर झाला. मग काय, यावरून अंकिता ट्रोल झाली.

सुशांतच्या मृत्यूला काही महिनेच झाले असताना अंकिताने इतक्या धूमधडाक्यात बर्थ डे साजरा केला, हेही अनेकांना खटकले. यावरूनही अंकिताला ट्रोल केले गेले. सुशांतसाठी तरी यावर्षी बर्थ डे साजरा करायचा नसता, असे म्हणत अनेकांनी तिच्यावर टीका केली.

शेखर सुमनने यावर्षी स्वत:चा वाढदिवस साजरा केला नाही, याची आठवणही अनेकांनी तिला करून दिली. संदीप सिंगला तू पार्टीत बोलवले आणि व्हिडीओत लपवले. तुझ्याबद्दल आधी आदर होता. पण आता थोडाही आदर नाही, असे एका युजरने लिहिले. अर्थात काहींनी अंकिताची बाजू घेत, तिला सपोर्टही केला. सुशांत हा अंकिताचा भूतकाळ होता. तिलाही आनंदी राहण्याचा अधिकार आहे, असे म्हणत अनेकांनी तिची बाजू मांडली.

अंकिता लोखंडे विकी जैनसह असलेल्या रिलेशनशिपमुळे सध्या चर्चेत आहे. लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. अंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. अंकिता आणि सुशांतची भेट 2009 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेवेळी झाली होती. त्यानंतर दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. पुढे 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअप होण्यामागे वेगवेगळी कारणे सांगितली गेली. पण तो भूतकाळ झाला आणि विकी हा अंकिताचा वर्तमान आहे.

 

टॅग्स :अंकिता लोखंडे