Join us  

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यान काय घडलं? पापाराझींवर भडकली अंकिता लोखंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 5:33 PM

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत अंकिता पापाराझींवर भडकल्याचं दिसत आहे.

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमातून वीर सावरकांचा जीवनपट उलगडण्यात आला आहे. या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडेही झळकली आहे. अंकिताने या सिनेमात 'स्वातंत्र्यवीर सावरकर' यांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमामुळे अंकिता चर्चेत आहे. 

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत अंकिता पापाराझींवर भडकल्याचं दिसत आहे. 'विरल भय्यानी' या पापाराझी पेजवरुन अंकिताचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत अंकिता पापाराझींवर भडकल्याचं दिसत आहे. "हे बरोबर नाही...तुम्ही बाहेर जा. सिनेमा सुरू आहे", असं अंकिता म्हणताना दिसत आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाच्या स्क्रिनिंगला 'बिग बॉस' फेम अभिषेक कुमार आणि खानजादी यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी थिएटरमध्ये जाताना त्यांच्यामागून पापाराझीही आतमध्ये जात होते. हे पाहून अंकिता चिडली आणि त्यांच्यावर ओरडली. तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 

"अंकिता बरोबर बोलत आहे", अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने "तिचं चिडणं स्वाभाविक आहे...परवानगी नसताना ते जबरदस्ती आतमध्ये जात आहेत," असंही एकाने म्हटलं आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा सिनेमा २२ मार्चला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातून रणदीप हुड्डाने दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. 

टॅग्स :अंकिता लोखंडेरणदीप हुडासिनेमासेलिब्रिटी