Join us  

अंकिताने सांगितली मिलिंद सोमण आणि तिची लव्ह स्टोरी, अशी झाली होती त्यांची पहिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 1:27 PM

ह्युमन्स ऑफ बॉम्बे या ब्लॉगवर अंकिताने नुकतीच लिहिलेली एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये तिने मिलिंद आणि तिच्या पहिल्या भेटीचा किस्सा, त्यांचे प्रेमप्रकरण याविषयी लिहिले आहे.

ठळक मुद्देकाही दिवसांनी मी त्याला त्याच हॉटेलच्या नाईट क्लबमध्ये पाहिले. त्यावेळी आमची नजरानजर झाली. तो माझ्याकडे पाहात होता आणि मी त्याच्याकडे... मिलिंदसोबत जाऊन बोलण्याचा माझ्या मित्रांनी मला सल्ला दिला. मी त्याच्यासोबत जाऊन बोलले.

अंकिता कुवर हे नाव गेल्या काही महिन्यांपर्यंत कोणाला माहीत देखील नव्हते. पण मिलिंद सोमणसोबत लग्न केल्यानंतर ती अचानक चर्चेत आली. मिलिंद आणि अंकिता यांच्यात २६ वर्षांचे अंतर आहे. मिलिंद ५३ वर्षांचा होता तर अंकिता केवळ २७ वर्षांची होती, त्यावेळी त्यांनी लग्न केले. ह्युमन्स ऑफ बॉम्बे या ब्लॉगवर अंकिताने नुकतीच लिहिलेली एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये तिने मिलिंद आणि तिच्या पहिल्या भेटीचा किस्सा, त्यांचे प्रेमप्रकरण याविषयी लिहिले आहे.

अंकिताने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, मी देश सोडण्याचे ठरवले होते. त्यामुळे मी एअर एशियामध्ये काम करायला सुरुवात केली. मी मलेशियाममधील केबिन क्रू मध्ये काम करत होती. त्याचवेळी माझ्या बॉयफ्रेंडचे अचानक निधन झाले. यामुळे मी प्रचंड दुःखात होते. आयुष्यात सगळे काही आता संपलंय असेच मला वाटत होते. त्याचवेळी अचानक माझी पोस्टिंग चेन्नईमध्ये झाली. मी तेथील एका हॉटेलमध्ये माझ्या सहकाऱ्यांसोबत थांबले होते. त्यावेळी मी प्रथम मिलिंदला पाहिले. मी त्याची खूप मोठी फॅन होती. त्यामुळे मी त्याच्याशी बोलायला गेले. पण तो प्रचंड बिझी होता. त्यामुळे माझे त्या दिवशी त्याच्याशी काही बोलणे झाले नाही. 

त्यानंतर काही दिवसांनी मी त्याला त्याच हॉटेलच्या नाईट क्लबमध्ये पाहिले. त्यावेळी आमची नजरानजर झाली. तो माझ्याकडे पाहात होता आणि मी त्याच्याकडे... मिलिंदसोबत जाऊन बोलण्याचा माझ्या मित्रांनी मला सल्ला दिला. मी त्याच्यासोबत जाऊन बोलले. तसेच त्याच्याला डान्स करण्याविषयी विचारले आणि तोही क्षणात तयार झाला. त्या दिवशी एक वेगळेच फिलिंग मला वाटत होते. पण मला पुन्हा नात्यात पडण्याची भीती वाटत होती. त्यामुळे मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. पण त्यानेच येऊन माझा नंबर मागितला. 

त्यानंतर आठवड्याभरानंतर मी मिलिंदला मेसेज केला आणि त्यानंतर आम्ही डिनरला गेलो. या भेटीनंतर आम्ही एकमेकांना सतत मेसेज, फोन करू लागलो. तसेच सतत भेटू लागलो. मी काहीच दिवसांत माझ्या बॉयफ्रेंडच्या मृत्युविषयी त्याला सांगितले आणि त्याची आठवण माझ्या मनात नेहमीच राहाणार हे देखील त्याला सांगितले. पण मी तुझ्यावर प्रेम करतो, म्हणजे तुझ्या सगळ्या गोष्टींना मी स्वीकारले आहे असे तो म्हणाला आणि तेव्हाच ही व्यक्ती केवळ माझ्यासाठीच बनली आहे याचा विश्वास माझ्या मनात निर्माण झाला. आम्ही पाच वर्षं डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. आमच्या वयातील अंतरावरून सुरुवातीला घरातल्यांचा विरोध होता. पण आम्हाला आनंदित पाहिल्यानंतर ते देखील आमच्या लग्नासाठी तयार झाले. 

टॅग्स :मिलिंद सोमण