Join us

अंजली तन्मयवर भडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 17:56 IST

एआयबीचा सदस्य असलेल्या तन्मय भटने ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर आणि क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांच्यावर अतिशय वाईट शब्दांत कमेंट केली ...

एआयबीचा सदस्य असलेल्या तन्मय भटने ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर आणि क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांच्यावर अतिशय वाईट शब्दांत कमेंट केली होती. यानंतर सोशल मीडियावर लोकांनी तन्मयला चांगलेच सुनावले होते. सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तर तन्मयवर प्रचंड भडकली आहे. तिने म्हटले आहे की, कोणाचा अपमान करणे हे खरेच मजेशीर नाहीये. कॉमेडियननी कॉमेडी आणि अपमान या दोन गोष्टींमधील फरक ओळखणे गरजेचे आहे असे स्पष्ट मत अंजलीने मांडले आहे.