Join us

अनिल म्हणतो,‘हर्षवर्धन दिसतो आईसारखा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2016 14:36 IST

स्टारकिडस् जेव्हा बॉलिवडूमध्ये पदार्पण करतात तेव्हा त्यांची तुलना त्यांच्या स्टार आईवडिलांशी केली जाते. अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धनही तरी त्याला ...

स्टारकिडस् जेव्हा बॉलिवडूमध्ये पदार्पण करतात तेव्हा त्यांची तुलना त्यांच्या स्टार आईवडिलांशी केली जाते. अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धनही तरी त्याला अपवाद कसा ठरेल! नुकताच त्याचा डेब्यू चित्रपटाचा फर्स्ट लूक लाँच झाला आहे. ‘मिर्झिया’ चित्रपटातून तो चंदेरी दुनियात पाऊल ठेवत आहे.हर्षवर्धन त्याच्यासारखा दिसतो का असे विचारले असता अनिल म्हणतो की, हर्षवर्धन माझ्यासारखा नाही तर त्याच्या आईसारखा दिसतो. त्याला अशी तुलना आवडत नाही. आम्ही सर्व जण त्याला घाबरून असतो. त्याच्याविषयी इतरांना बोललेले त्याला बिल्कुल आवडत नाही. त्याची परवानगी घेऊनच बोलले बरे.‘निरजा’च्या यशामुळे सोनम सध्या खूप खूश आहे. आणि आता भाऊदेखील पदार्पण करतोय म्हटल्यावर त्याला सपोर्ट करताना ती म्हणाली की, तो खूप लाजाळू आहे. त्याला ग्राह्य धरणे आवडत नाही.राकेश मेहरा दिग्दर्शित या चित्रपटात हर्षवर्धनसोबत उशा किरण याची नात सैयामी खेरदेखील पदार्पण करत आहे. येत्या सात आॅक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.