Join us  

PHOTOS: अनिल व टीना अंबानींच्या मुलाच्या लग्नाचा थाट अन् बच्चन फॅमिलीची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 1:38 PM

Anil Ambani Tina Ambani Son's Wedding: अंबानी फॅमिलीच्या लग्नात सर्वाधिक लक्ष वेधलं ते बच्चन फॅमिलीनं. होय, अमिताभ बच्चन, जया बच्चन, त्यांची लेक श्वेता बच्चन आणि नात नव्या नवेली यांनी या लग्नसोहळ्याला आवर्जुन हजेरी लावली. त्यांचा थाट पाहण्यासारखा होता.

Anmol Ambani Khrisha Shah Wedding:  अंबानी कुटुंबात पुन्हा एकदा सनई चौघडे वाजलेत. अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचा मोठा मुलगा जय अनमोल अंबानी नुकताच क्रिशा शाह हिच्यासोबत लग्नबंधनात अडकला. 20 फेब्रुवारीला थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या लग्नात सर्वाधिक लक्ष वेधलं ते बच्चन फॅमिलीनं. होय, अमिताभ बच्चन, जया बच्चन, त्यांची लेक श्वेता बच्चन आणि नात नव्या नवेली यांनी या लग्नसोहळ्याला आवर्जुन हजेरी लावली. त्यांचा थाट पाहण्यासारखा होता.

 अमिताभ यांनी लग्नात क्रिम कलरची शेरवानी आणि फेटा असा रूबाबदार पेहराव केला होता. जया, श्वेता व नव्या यांचा थाटही कमी नव्हता. श्वेताने आई व लेकीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

कपूर कुटुंबातून रिमा जैन आणि आदर जैन या लग्नसोहळ्याला हजर होते. अंबानी घराण्याची नवी सून लग्नात अतिशय सुंदर दिसत होती.

 मुंबईत जन्मलेली आणि वाढलेली अंबानी घराची सून क्रिशा ही एक सामाजिक कार्यकर्ता आणि उद्योजक आहे जिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून सामाजिक धोरण आणि विकास विषयात पदवी घेतली आहे. तिने कॅलिफोर्निया विद्यापीठात राजकीय अर्थशास्त्राचाही अभ्यास केला आहे. ख्रिशाने काही काळ ब्रिटनमधील एक्सेंचरमध्ये काम केले परंतु उद्योजक बनण्यासाठी ती भारतात परतली. तिने #Lovenotfea नावाने कोरोना काळात  एक मानसिक आरोग्य मोहीम देखील सुरू केली. क्रिशा क्रिएटिव्ह कोलॅबोरेशन, इंटरनॅशनल नेटवर्किंग आणि कम्युनिटी बिल्डिंग' या विषयात खास असलेल्या डिस्को या सोशल नेटवर्क कंपनीची संस्थापक आहे.  

टॅग्स :अनिल अंबानीटीना मुनिमजया बच्चननव्या नवेली