Join us

परी जगतेय आॅस्ट्रिलियाचे स्वप्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 03:25 IST

 बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही तिचे लहानपणीचे स्वप्न जगते आहे. 

 बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही तिचे लहानपणीचे स्वप्न जगते आहे. आॅस्ट्रेलिया येथील सुट्ट्या ती छानपैकी अ‍ॅडव्हेंचर करत आक ाशात फिरते आहे. तिच्या व्हॅकेशन्सदरम्यान, ती क्वीन्सलँड येथे एअर टूर करत आहे. ग्रेट बॅरिअर रीफचा अत्यंत जवळचा लुक तिला पहायला मिळाला. नंतर, तिने इन्स्टाग्रामवर तिच्या या राईडचे फोटो अपलोड केले आहेत. या फोटोला तिने कॅप्शन टाकले आहे की,‘ अ मीरियाड आॅफ कलर्स आॅन द ग्रेट बॅरिअर रीफ.’ एवढेच नव्हे तर ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ अभिनेत्री सोशल मीडियावर तिचे आत्तापर्यंतचे क्लिक्स अपलोड करत आहे. परिणीती तिचा आगामी चित्रपट ‘मेरी प्यारी बिंदू’ मध्ये आयुषमान खुराना सोबत दिसणार आहे.source : indiglamour.com