Join us

-आणि प्रतीक्षा संपली!! पाहा :‘बाहुबली2’चा फर्स्ट लूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2016 14:51 IST

‘बाहुबली2’चा फर्स्ट लूक पाहण्यासाठी तुम्ही-आम्ही सगळेच आतूर होतो. आज शनिवारी अखेर आपणा सर्वांची प्रतीक्षा संपली. ‘बाहुबली2’चा फर्स्ट लूक आज जारी करण्यात आला.

‘बाहुबली2’चा फर्स्ट लूक पाहण्यासाठी तुम्ही-आम्ही सगळेच आतूर होतो. आज शनिवारी अखेर आपणा सर्वांची प्रतीक्षा संपली. ‘बाहुबली2’चा फर्स्ट लूक आज जारी करण्यात आला. मुंबईत एका कार्यक्रमात  राणा डग्गुबती आणि प्रभास यांच्या ‘बाहुबली2’चा लूक पहिल्यांदा जगापुढे आला. या फर्स्ट लूकसोबतच ‘बाहुबली:दी कनक्लुजन’चा ‘360 डिग्री मेकिंग व्हिडिओ’ आणि ‘एक ग्राफिक नॉव्हेल’ही लॉन्च करण्यात आले. 2015 मध्ये आलेल्या ‘बाहुबली’ने धुमाकूळ घालत बॉक्स आॅफिसवर रेकॉर्डब्रेक  १०० कोटीहून अधिकची कमाई केली होती.  ‘बाहुबली: दी बिगीनिंग’मध्ये मुख्य भूमिका साकारणारा  प्रभास असो वा खलनायकाची भूमिका साकारणारा राणा डग्गुबती, या सगळ्यांनीच अपार लोकप्रीयता मिळवली. खांद्यावर विशाल शिवलिंग उचललेला अभिनेता प्रभास पाहून तर चित्रपटरसिक थक्क झाले होते. आता ‘बाहुबली2’पाहण्यास प्रेक्षक उत्सूक आहेत. कटप्पाने बाहुबली को क्यूं मारा? हे जाणून घेण्याची उत्कंठा सिनेप्रेमींना लागली आहे.  या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना ‘बाहुबली2’मध्ये मध्यतरानंतर अर्थात क्लायमॅक्समध्ये मिळणार आहे.  या क्लायमॅक्स सीनवर तब्बल 30 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची चर्चा आहे. . 
‘बाहुबली2’च्या चित्रीकरणाला गतवर्षी डिसेंबरमध्ये सुरुवात झाली. त्यानंतर प्रभासने चार महिने इथेच विशेष प्रशिक्षण घेतले. प्रत्येक दृश्यायासाठी त्याने कठोर परिश्रम घेतले. त्याची ही मेहनत किती फळास आली, ते लवकरच दिसणार आहे.आता लवकरच या चित्रपटाचा सीक्वल ह्यबाहुबली: दी कनक्ल्युजनह्ण आपल्याला पाहायला मिळणार आहे.