Join us  

अन् बॉक्स ऑफिसवर सुशांत सिंग राजपूत- शाहरुख खानचा सामना टळला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 4:46 AM

बॉलिवूडमध्ये मधले दोन चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर सामना होणे ही गोष्ट तशी सामान्य आहे. पुढच्या वर्षी रिलीज होणारा रणवीर सिंगचा ...

बॉलिवूडमध्ये मधले दोन चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर सामना होणे ही गोष्ट तशी सामान्य आहे. पुढच्या वर्षी रिलीज होणारा रणवीर सिंगचा सिम्बा, सुशांत सिंग राजपूतचा केदारनाथ आणि शाहरुख खानचा चित्रपट एकाच दिवशी रिलीज होण्याची शक्यता आहे. रणवीर सिंगने आपल्या सिम्बा चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. मात्र सुशांत सिंग आणि शाहरुख खानचा आनंद एल राय यांच्या चित्रपटामध्ये क्लैश होणार होते. दोन्ही चित्रपट 21 डिसेंबर 2018 ला रिलीज होणार होते. केदारनाथच्या क्रिअर्जची हेड प्रेरणा अरोराने या यासंदर्भात शाहरुख खानची भेट घेतली आहे. त्यामुळे दोन्ही चित्रपटांमध्ये होणारे क्लैश थांबवण्या संदर्भात या भेटीमध्ये जरुर बोलणं झाले असेल. मात्र यावेळी त्यांचे काय बोलणं झाले याचा खुसाला होऊ शकलेला नाही. मात्र या भेटीनंतर प्रेरण अरोराने चित्रपटाची रिलीज डेट अजूनपर्यंत निश्चित झाली नसल्याचे सांगितले आहे.  प्रेरणा म्हणाली चित्रपटाच्या रिलीज डेट संदर्भात मी दिग्दर्शक अभिषेक कपूरशी चर्चा करणार आहे. आम्ही चित्रपटाची रिलीज डेटमध्ये बदल करणार आहोत. शाहरुख खानचा चित्रपट रिलीज झाल्यानंतर आम्ही केदारनाथ रिलीज करु.  ALSO READ :  सारा अली खानसाठी मुंबईतच उभारले ‘केदारनाथ’, कोट्यवधी रुपयांचा केला खर्च!केदारनाथमधून सैफ अली खानची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये डेब्यू करते आहे. साराने आपल्या डेब्यूसाठी अभिषेक कपूरच्या केदारनाथ चित्रपटाची निवड केली. यात तिच्या अपोझिट सुशांत सिंग राजपूत दिसणार आहे.  हा चित्रपट २०१३ मध्ये ‘केदारनाथ’मध्ये आलेल्या प्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. चित्रपटात सारा एक साधी आणि गर्ल नेट डोरच्या इमेजमध्ये दिसणार आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे. हा दोघांची लव्हस्टोरी या चित्रपटात बघायला मिळणार आहे. सारा एका श्रीमांत घरातील मुलगी असते आणि पिठ्ठू तिच्या प्रेमात पडतो. सारा आपल्या पहिल्या चित्रपटाला घेऊन एक्साइटेड आहे.शाहरुख खानच्या चित्रपट कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा बिग बजेट चित्रपट असल्याची माहिती मिळते आहे. या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे.