अनिल कपूरच्या बर्थ डे पार्टीत अवतरले तारांगण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 13:54 IST
बॉलिवूडमध्ये मागील 30 वर्षांहून अधिक काळापासून अनिल कपूरचा जलवा कायम आहे. शंभराहून अधिक चित्रपटात काम करणार्या अनिल कपूरने अभिनय ...
अनिल कपूरच्या बर्थ डे पार्टीत अवतरले तारांगण
बॉलिवूडमध्ये मागील 30 वर्षांहून अधिक काळापासून अनिल कपूरचा जलवा कायम आहे. शंभराहून अधिक चित्रपटात काम करणार्या अनिल कपूरने अभिनय व स्टाईलच्या आधारे आपली वेगळी ओळख जपली आहे.बॉलिवूडमधील या 'झक्कास' अभिनेत्याचा 59 वा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्ताने एका खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक दिग्गज स्टार्सनी हजेरी लावली.अनिल कपूरचा भाऊ निर्माता बोनी कपूर, वहिनी श्रीदेवी, मुलगी सोनम कपूर, अर्जुन कपूर याच्यासह आमिर खान-किरण राव, सलमान खान, सैफ अली खान - करिना कपूर, फरहान अख्तर, झोया अख्तर, रणवीर सिंग, अनुपम खेर, जॅकी श्रॉफ, फराह खान, रितेश सिधवानी, वरुण धवन, सतीश कौशिक, राजकुमार हिरानी यांच्यासह अनेकांनी अनिल कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.