Join us  

‘SOTY 2’मधून नाही ‘या’ चित्रपटातून होणार चंकी पांडेची मुलगी अनन्याचा डेब्यू!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 8:19 AM

चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे लवकरच बॉलिवूड डेब्यू करतेय,हे तर तुम्हाला ठाऊक आहेच़ पण कोणत्या चित्रपटातून तिचा डेब्यू होतोय, हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसणार. 

चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे लवकरच बॉलिवूड डेब्यू करतेय,हे तर तुम्हाला ठाऊक आहेच़ पण कोणत्या चित्रपटातून तिचा डेब्यू होतोय, हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसणार. होय, कारण करण जोहरच्या ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मधून अनन्या डेब्यू करतेय, हेच मानले जात होते. पण सूत्रांनी दिलेली माहिती खरी मानाल तर ‘गली ब्लॉय’ या चित्रपटातून तिचा डेब्यू होणार आहे. याचे कारण म्हणजे, ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’ची लांबलेली रिलीज डेट. ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’ लांबणीवर पडल्याची बातमी आम्ही काही दिवसांपूर्वीच दिली होती. आता हा चित्रपट पुढील वर्षी मे महिन्यात रिलीज होणार आहे. याऊलट रणवीर सिंग स्टारर ‘गली ब्लॉय’ पुढील वर्षी व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर रिलीज होतोय. ‘गली ब्लॉय’मध्ये रणवीर सिंग व आलिया भट्ट लीड रोलमध्ये आहेत. पण या चित्रपटात अनन्याचीही एक लहानशी भूमिका आहे. त्यामुळे जोया अख्तर दिग्दर्शित हा चित्रपट खऱ्या अर्थाने अनन्याचा डेब्यू चित्रपट असणार आहे. अर्थात यानंतर येणा-या ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मधून अनन्याचे ग्रॅण्ड लॉन्चिंग होणार आहे.

पुनीत मल्होत्रा ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’ दिग्दर्शित करतोय. टायगर श्रॉफ या चित्रपटात लीड रोलमध्ये आहे. त्याच्यासोबत अनन्या आणि तारा सुतारिया या दोघी आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहेत. हा चित्रपट निर्माता व दिग्दर्शक करण जोहरच्या २०१२ मध्ये आलेल्या ‘स्टुडंट आॅफ द ईयर2’ या चित्रपटाचा सीक्वल आहे. या चित्रपटात वरुण धवन, आलिया भट्ट  आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी काम केले होते. या तिघांनी या चित्रपटाच्या माध्यमातूनच आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. आज हे तिन्ही स्टार्स इंडस्ट्रीमध्ये कमालीचे यशस्वी आहेत.