Join us

तापसी पन्नूनंतर एमी जॅक्सननेही शेअर केला बिकिनी फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2017 21:41 IST

​बॉलिवूडच्या दोन अभिनेत्री चित्रपटांबरोबरच सोशल मीडियावरही आपल्या सौंदर्याची जादू दाखवित आहेत. नुकतेच या दोघींनी इन्स्टाग्राम अकाउंटवर बिकिनी फोटोज शेअर केल्याने त्या चर्चेत आल्या आहेत.

बॉलिवूडच्या दोन अभिनेत्री चित्रपटांबरोबरच सोशल मीडियावरही आपल्या सौंदर्याची जादू दाखवित आहेत. नुकतेच या दोघींनी इन्स्टाग्राम अकाउंटवर बिकिनी फोटोज शेअर केल्याने त्या चर्चेत आल्या आहेत. या दोघींचेही हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. होय, ‘पिंक’ फेम तापसी पन्नू आणि एमी जॅक्सन या दोघींनी बिकिनी फोटो शेअर करीत इन्स्टावर आग लावली आहे. दोघींचे हे फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अगोदर तापसीने बिकिनी फोटो शेअर केल्यानंतर लगेचच एमी जॅक्सननेही बिकिनी फोटो शेअर केला. तापसी अभिनेता वरुण धवन याच्यासोबत ‘जुडवा-२’मध्ये बघावयास मिळणार आहे. या चित्रपटाची शूटिंग नुकतीच पूर्ण करण्यात आली असून, आता ‘जुडवा’ची संपूर्ण टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होणार आहे. त्याचबरोबर तापसी लवकरच अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत एका चित्रपटाला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात तापसी ऋषी कपूर यांच्या सुनेच्या भूमिकेत असेल.  ">http://तर एमी जॅक्सन सध्या सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी अक्षयकुमार यांच्यासोबत ‘२.०’ मध्ये काम करीत आहे. तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या चित्रपटात एमी अतिशय डॅशिंग अंदाजात बघावयास मिळणार आहे. हा बॉलिवूडचा आतापर्यंतचा सर्वांत बिग बजेट चित्रपट असल्याची चर्चा आहे. सूत्रानुसार या चित्रपटाचे बजेट सुमारे ४५० कोेटी रुपये आहे. चित्रपटात या तिघां व्यतिरिक्त आदिल हुसेन, सुधांशू पांडे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अक्षयकुमारचा हा पहिलाच तामिळ चित्रपट आहे. दरम्यान, तापसी आणि एमीच्या या बिकिनी फोटोंची सध्या सर्वत्र चर्चा असून, चाहत्यांकडून त्यास प्रचंड लाइक्स आणि कमेण्ट दिल्या जात आहेत. त्याचबरोबर दोघींचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत आहेत. फोटोमध्ये दोघीही समुद्र किनारी असून, रिलॅक्स मुडमध्ये दिसत आहेत.