Join us  

​करिनाच्या प्रेग्नंसीबाबत विचारले अन् अमृता सिंग संतापल्या ..

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2016 2:44 PM

बी-टाऊनमध्ये सध्या केवळ आणि केवळ करिना कपूर खान हिच्याच प्रेग्नंसीची चर्चा सुरु आहे. करिना येत्या डिसेंबरमध्ये आई होणार, हे ...

बी-टाऊनमध्ये सध्या केवळ आणि केवळ करिना कपूर खान हिच्याच प्रेग्नंसीची चर्चा सुरु आहे. करिना येत्या डिसेंबरमध्ये आई होणार, हे सैफने जाहिर केल्यापासून करिना व सैफचे कुटुंब आणि मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण आहे. सैफ आणि त्याची एक्स वाईफ अमृता सिंग यांना सारा आणि इब्राहिम अशी दोन मुले आहेत. आता सैफ तिसºया बाळाचा बाप होणार आहे. दुसºया विवाहातून बाप होणारा सैफ बॉलिवूडमधील एकटा अ‍ॅक्टर नाही. आमीर खान यालाही पहिली पत्नी रीना हिच्यापासून जुनैद आणि इरा ही दोन मुले आहेत. यानंतर आमीरने किरण राव हिच्याशी लग्न केले आणि  आमीर व किरण यांच्या तिसºया मुलाचा म्हणजे आझादचा जन्म झाला. आझादच्या जन्माच्या आनंदात रीना सहभागीही झाली होती. अमृता सिंग मात्र आपल्या भावना कदाचित जाहिर करू इच्छित नाही. जेव्हा एका महिला पत्रकाराने अमृता सिंग यांना करिनाच्या प्रेग्नंसीबाबत विचारले तेव्हा अमृता कमालीच्या भडकल्या. तुम्हाला असे मूर्खपणाचे प्रश्न विचारण्याची हिंमतच कशी होते. तू कोण आहेत? पुन्हा मला कॉल करायचा नाहीस..असे रागारागात अमृता यांनी पलीकडून फोनवर बोलणाºया महिला पत्रकाराला सुनावले..अमृता यांच्या या शब्दांवरून तरी करिना व सैफच्या येणाºया बाळाविषयी बोलण्यात त्यांना काहीही रस नाही, असेच दिसते. कदाचित अमृता यांनी बेबोचे खासगीत अभिनंदन केलेही असेल..होप सो!!