Join us

अमृता रावची बॅग गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 10:24 IST

'वि वाह' फेम अभिनेत्री अमृता राव 'ज्वेलरी शो' च्या कार्यक्रमासाठी जयपूरला गेली आहे. जयपूर विमानतळावर पोहोचल्यावर सामान घेताना अमृताला ...

'वि वाह' फेम अभिनेत्री अमृता राव 'ज्वेलरी शो' च्या कार्यक्रमासाठी जयपूरला गेली आहे. जयपूर विमानतळावर पोहोचल्यावर सामान घेताना अमृताला तिची एक बॅग गायब झाल्याचे लक्षात आले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या महागड्या चपलांचे सहा सेट या बॅगेत होते, ज्याची अंदाजे किंमत सुमारे एक लाख आहे. विमानतळ प्रशासनाकडे लेखी तक्रार करणार्‍या अमृताला विश्‍वास आहे की, तिची हरवलेली बॅग नक्की सापडेल. पुढील पाच दिवसांसाठी ती जयपूरमध्ये शूटिंग करणार आहे. अमृताची बॅग लवकरात लवकर सापडावी हिच प्रार्थना.