Join us  

अमृता रावचा नवरा आरजे अनमोलचा फोटो तुम्ही पाहिला आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2019 4:36 PM

अमृताला नुकतेच अनमोलसोबत पाहाण्यात आले. त्या दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

ठळक मुद्देमुंबईतील एका पंचताराकित हॉटेलमध्ये एक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमासाठी अमृताने हजेरी लावली होती तर अनमोलदेखील याच हॉटेलमधील एका समारंभाचे सूत्रसंचालन करत होता.

शाहिद कपूरच्या इश्क विश्क या चित्रपटातील ती निष्पाप, चुलबुली हिरोईन आठवते का? पुढे ती विवाह चित्रपटातही शाहिदसोबत दिसली. होय आम्ही बोलतोय ते अभिनेत्री अमृता रावबद्दल... अमृताने मैं हूँ ना, सत्याग्रह यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतीच ती हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर बनवण्यात आलेल्या ठाकरे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. 

२०१६ मध्ये अमृता रावने आरजे अमनोल सोबत लग्न केले. अनमोल खूपच कमी कार्यक्रमात आपल्याला पाहायला मिळतो. तो त्याच्या पत्नीसोबत तर सार्वजनिक ठिकाणी जाणे नेहमीच टाळतो. पण त्याला आणि अमृताला नुकतेच एकत्र पाहाण्यात आले. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. मुंबईतील एका पंचताराकित हॉटेलमध्ये एक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमासाठी अमृताने हजेरी लावली होती तर अनमोलदेखील याच हॉटेलमधील एका समारंभाचे सूत्रसंचालन करत होता. त्यामुळे दोघे आपापले काम झाल्यानंतर एकत्र जेवताना दिसले. त्यावेळी त्यांच्या दोघांचा फोटो फोटोग्राफर्सनी कॅमेरात टिपला. त्यावेळी ते दोघेही खूपच सुंदर दिसत होते. या दोघांची जोडी खूपच क्यूट दिसत असल्याचे त्यांच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. ते या फोटोवर कमेंट करून त्यांना हा फोटो खूपच आवडला असल्याचे सांगत आहेत. हा फोटो हजारहून अधिक लोकांनी लाईक केला आहे.

2016 मध्ये अमृताने आरजे अमोलशी गुपचूप लग्न केले होते. ट्विटरद्वारे ही बातमी सांगत तिने तिच्या फॅन्सना धक्का दिला होता. लग्न करण्यापूर्वी अमृता आणि अनमोल यांनी जवळजवळ एकमेकांना सात वर्षं डेट केले. पण त्यांनी ही गोष्ट सगळ्यांपासून दडवून ठेवली होती. अमृता आणि अनमोलची भेट अमृताच्या एका मुलाखतीच्या दरम्यान झाली होती. या मुलाखतीनंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आले. पण सुरुवातीला केवळ त्यांच्या दोघांमध्ये मैत्री होती. पण त्यांच्या लग्नाच्या दोन वर्षांपूर्वी अनमोलला डेंग्यू झाला होता. याच दरम्यान त्या दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले असे म्हटले जाते. 

टॅग्स :अमृता राव