Join us  

Good News : अभिनेत्री अमृता राव बनली आई, गोंडस मुलाला दिला जन्म

By रूपाली मुधोळकर | Published: November 02, 2020 10:42 AM

अमृता-अनमोलच्या घरी नवा पाहुणा

ठळक मुद्देशाहिद व अमृता राव या दोघांचा ‘विवाह’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. असे म्हणतात की, या चित्रपटादरम्यान शाहिद व अमृता हे दोघे बरेच जवळ आले होते.

 होय, ‘विवाह’ फेम अभिनेत्री अमृता राव आणि तिचा पती आरजे अनमोल पहिल्यांदाच आई-बाबा झाले आहेत. अमृताने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. अमृता-अनमोलने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. रविवारी सकाळी अमृताने मुलाला जन्म दिला. आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. अमृताने अनेक महिने प्रेग्नंसीची गोष्ट लपवून ठेवली होती. अमृता लॉकडाऊनआधीच प्रेग्नंट होती. अलीकडे अमृता व तिचा पती आर जे अनमोल खारमधील एका क्लिनिक बाहेर दिसलेत. यावेळी अमृताचा बेबी बम्प स्पष्ट दिसला. यानंतर ती प्रेग्नंट असल्याची बातमी सर्वांना कळली.

ग्लॅमर इंडस्ट्रीचा भाग असले तरी अमृता व अनमोल अतिशय खासगी आयुष्य जगणे पसंत करते. 2016मध्ये अमृताने आरजे अनमोलशी गुपचूप लग्न केले. लग्नापूर्वी अमृता व अनमोल 7 वर्षे डेटींग करत होते. अर्थात अमृताने हे सगळे दडवून ठेवले. अमृता व अनमोलची भेट एका मुलाखतीदरम्यान झाली होती. या मुलाखतीनंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आलेत. लग्नाच्या दोन वर्षांपूर्वी अनमोलला डेंग्यू झाला होता. याचदरम्यान दोघांची मैत्री प्रेमात बदलली.

अमृताने 2002 मध्ये ‘अब के बरस’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. यांनतर ती ‘द लीजेंड ऑफ भगत सिंह’मध्ये दिसली होती. पण अमृताला खरी ओळख शाहिद कपूरसोबतच्या ‘इश्क विश्क’ आणि ‘विवाह’ या चित्रपटाने दिली.

अमृता राव बॉलिवूडमध्ये आली. पण तिची इमेज ‘गर्ल - नेक्स्ट -डोर’अशीच बनून राहिली.  आपल्या करिअरमध्ये ती कुठल्याही विवादात अडकली नाही. पण अशी एक वेळ आली की, करिना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या ब्रेकअपसाठी अमृता जबाबदार असल्याची चर्चा झाली.

शाहिद व अमृता राव या दोघांचा ‘विवाह’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. असे म्हणतात की, या चित्रपटादरम्यान शाहिद व अमृता हे दोघे बरेच जवळ आले होते. त्याचवेळी करिना व शाहिद रिलेशनशिपमध्ये होते. अमृताची शाहिदसोबतची जवळीक करिनाला अजिबात आवडली नाही आणि याचमुळे दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. अमृता व शाहिदच्या ‘लिंकअप’च्या बातम्यांनी शाहिद-करिनाचे नाते संपुष्टात आणले. अर्थात अमृता राव लिंकअपच्या सगळ्या चर्चा नाकारल्या होत्या. शाहिद केवळ माझा को-स्टार होता, बाकी काहीही नाही, असे तिने सांगितले होते.

‘विवाह’ सिनेमातील ‘छुटकी’ आठवते? आता पाहाल, तर पाहातच राहाल

यानंतर एका अभिनेत्यासोबत किस सीन द्यायला नकार दिल्यामुळे अमृता चर्चेत आली होती. 2007 मध्ये अमृता रावला यशराज फिल्म्सची ऑफर मिळाली. या चित्रपटात तिचा रणबीर कपूरसोबतचा किस सीन होता. मात्र अमृताने रणबीरला किस करण्यास नकार दिला. यानंतर चर्चा फिस्कटली आणि अमृताने हा चित्रपटच नाकारला. आता या बातम्यांमध्ये किती सत्यता आहे, हे ठाऊक नाही. कारण अमृता या बातमीने कमालीची डिस्टर्ब झाली होती. इतकी की, यासाठी खुलासा देण्यासाठी तिला समोर यावे लागले होते.

टॅग्स :अमृता राव