Join us  

Fact Check : अमृता अरोरानं चक्क शिल्पा शेट्टीच्या पतीला किस केलं ? जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 11:19 AM

Fact Check : मलायका अरोराची (Malaika Arora) बहीण अमृता अरोराने सोशल मीडियावर एक रोमँटिक फोटो शेअर केला आणि हा फोटो पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. होय, सोशल मीडियावरही या फोटोची जोरदार चर्चा रंगली.

मलायका अरोराची (Malaika Arora) बहीण अमृता अरोरा  (Amrita Arora) सोशल मीडियावर किती अ‍ॅक्टिव्ह आहे, हे वेगळं सांगायला नको. ती नेहमीच इन्स्टाग्रामवर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकताच तिने सोशल मीडियावर एक रोमँटिक फोटो शेअर केला आणि हा फोटो पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. होय, सोशल मीडियावरही या फोटोची जोरदार चर्चा रंगली. होय, हा फोटो पाहून शिल्पा शेट्टीचा  (Shilpa Shetty) पती राज कुंद्रानंअमृता अरोराला किस केल्याची चर्चा सुरू झाली. फोटोमध्ये अमृतासोबत असलेली व्यक्ती अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) असल्याचा दावा केला गेला. अनेकांनी यावरून अमृताला सोशल मीडियावर ट्रोल करणंही सुरू केलं.

आता अमृृताच्या या फोटोचं राज कुंद्राशी काय कनेक्शन आहे? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आम्ही तुमचं कंफ्यूजन दूर करतो. मुळात काही कंफ्युज युजर्समुळे सोशल मीडियावर अमृताला ट्रोल व्हावं लागतंय. कारण अमृताच्या अंडरवॉटर फोटोतील तिला किस करणारी व्यक्ती राज कुंद्रा नसून तिचा पती शकील आहे.शकील काहीसा राज कुंद्रासारखा दिसल्यामुळे अनेकांना त्याला राज कुंद्रा समजून अमृताला ट्रोल करणं सुरू केलं. या फोटोमध्ये ती पती शकीलला किस करताना दिसत आहे. 

अमृताच्या या फोटोवर असंख्य चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहे. ‘ मला वाटतं हा राज कुंद्रा आहे,’ असं एकाने लिहिलं. दुसऱ्यानेही ‘एका सेकंदासाठी मला वाटलं की तो राज कुंद्रा आहे’, असं लिहिलं.  इतरही अनेक युजर्सनी फोटोतील व्यक्ती राज कुंद्रा आहे हे समजून अमृताला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.   अमृता अरोरानं 2009 साली कंन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमधील बिझनेसमॅन शकील लडकशी (Shakeel Ladak) लग्न केलं होतं. या दोघांना अजान आणि रियान नावाची दोन मुलं आहेत. अमृताने 2002 साली  फरदीन खानसोबत ‘कितने दूर कितने पास’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती ‘आवार पागल दीवाना’ यासह अनेक चित्रपटांत झळकली. पण तिचं करिअर फार काही चाललं नाही. आताश: ती गर्ल गँगसोबत पार्ट्या करताना तेवढी दिसते. अमृता करिना कपूर व करिश्मा कपूरची जवळची मैत्रिण आहे.

टॅग्स :अमृता अरोराराज कुंद्राशिल्पा शेट्टीमलायका अरोरा