Join us  

Yeh Saali Aashiqui Movie : आता होणार अमरिश पुरींच्या नातवाचा धमाकेदार डेब्यू, मोशन पोस्टर रिलीज 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 9:00 AM

'Yeh Saali Aashiqui Movie : होय, अमरिश पुरी यांच्या नातवाचा पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

ठळक मुद्देलुक्स आणि स्टाईलच्या बाबतीत वर्धन अन्य अभिनेत्यांच्या जराही मागे नाही. त्याचे अख्खे इन्स्टाग्राम अकाऊंट स्टाईलिश फोटोंनी भरलेले आहे.  

बॉलिवूडचे ‘मोगॅम्बो’अमरिश पुरी आज आपल्यात नाहीत. पण त्यांचा नातू त्यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेण्यासाठी सज्ज झाला आहे. होय, अमरिश पुरी यांच्या नातवाचा पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटाचे नाव आहे, ‘ये साली आशिकी’.‘ये साली आशिकी’ या चित्रपटातून अमरिश पुरी यांचा नातू वर्धन पुरीचा डेब्यू होतोय. या चित्रपटात शिवालिका ओबेरॉय त्याची हिरोईन असेल. शिवालिकाचाही हा पहिला चित्रपट आहे. शिवालिकाने गतवर्षी टीव्ही अभिनेता करम राजपालसोबत साखरपुडा केला होता. 

नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. चिराग रूपारेल यांनी हा  रोमॅन्टिक थ्रीलर चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चिराग यांनी याआधी लफंगे परिंदे, दो दुनी चार, इश्कजादे, शुद्ध देसी रोमान्स, दावत ए इश्क या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कम केले आहे.

वर्धनने याआधी अनेक व्यावसायिक व प्रायोगिक नाटकांमधून काम केले आहे. इतकेच नाही तर अनेक चित्रपटात साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेय. इशकजादे, दावत - ए - इश्क, शुद्ध देसी रोमांस अशा अनेक चित्रपटांसाठी त्याने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले.

अमरिश यांचे गुरू आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते अभिनेते सत्यदेव दुबेकडून यांच्याकडून वर्धनने अभिनयाचे धडे घेतले. याकाळात दुबेंनी आधी त्याला बॅकस्टेजचे काम दिले. यादरम्यान वर्धनने  कास्ट आणि क्रू ला चहा देखील प्यायला दिला. अनेकदा स्टेजही साफ केला आहे.

 लुक्स आणि स्टाईलच्या बाबतीत वर्धन अन्य अभिनेत्यांच्या जराही मागे नाही. त्याचे अख्खे इन्स्टाग्राम अकाऊंट स्टाईलिश फोटोंनी भरलेले आहे.  

 

टॅग्स :अमरिश पुरी