Join us  

कोरोना इफेक्ट : अमिताभ बच्चनही आयसोलेशनमध्ये, हातावर BMCचा ‘शिक्का’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 10:02 AM

सामान्य जनतेपासून तर बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनीच कोरोना व्हायरसच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी विलीगीकरणाचा मार्ग पत्करल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देया स्टार्सशिवाय बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना व्हायरसचा धोका सतत वाढत असताना सामान्य जनतेपासून तर बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनीच या व्हायरसच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी विलीगीकरणाचा मार्ग पत्करल्याचे चित्र आहे. काल 97 वर्षांचे दिलीप कुमार कोरोनापासून बचावासाठी आयसोलेशन व क्वारंटाईनमध्ये गेलेत. यानंतर भजनसम्राट अनुप जलोटा हेही आयसोलेशनमध्ये आहेत. आता महानायक अमिताभ बच्चन यांनीही स्वत:ला आयसोलेशनचा मार्ग पत्करला आहे.होय, खुद्द अमिताभ यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. अमिताभ यांनी ट्विटरवर आपल्या हाताचा एक फोटो शेअर केला. यात एक स्टॅम्प (निळ्या शाईचा शिक्का)लागलेला आहे. या स्टॅम्पमध्ये आयसोलेशन अर्थात क्वारंटाईनबद्दल लिहिले आहे. जे लोक क्वारंटाईनमध्ये आहेत, त्यांच्या हातावर बीएमसीकडून असा स्टॅम्प लावण्यात येत आहेत. आता अमिताभ काही दिवस घरात बंद असतील. 31 मार्चपर्यंत कोरानापासून बचावासाठी ते घरात राहतील. अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये अन्य लोकांनाही काळजी घेण्याचे व सतर्कता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. 

काल अनुप जलोटा लंडनवरून मुंबईत परतले होते. वय बघता त्यांना काही दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. दिलीप कुमार यांनी स्वत:च आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरू नये, म्हणून संबंधित व्यक्तिला क्वारंटाईन वा आयसोलेशनमध्ये ठवेले जाते. म्हणजेच, हवेशीर बंद खोलीत वेगळे ठेवले जाते. 

या स्टार्सशिवाय बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला आहे. आलिया भट, अर्जुन कपूर, कॅटरिना कैफ, जॅकलिन फर्नांडिस, दीपिका पादुकोण असे सगळे सेलिब्रिटींचे दर्शन काही दिवस दुर्मिळ होणार आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चनकोरोना वायरस बातम्या