Join us  

वीरू देवगण यांच्या जळत्या चितेसमोर नुसते बसून होते अमिताभ बच्चन, लिहिली भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 2:25 PM

वीरू देवगण हे बच्चन कुटुंबाच्या अतिशय जवळ होते. त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी ऐकून अमिताभ बच्चन यांना प्रचंड धक्का बसला. आपल्या एका मित्राला गमावल्याचे दु:ख ते लपवू शकले नाहीत. त्याचमुळे वीरू देवगण यांच्या जळत्या चितेकडे बघत अमिताभ बराच वेळ नुसते बसून राहिले.

ठळक मुद्देवीरू देवगण यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीबद्दलही त्यांनी लिहिले.

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अ‍ॅक्शन कोरिओग्राफर आणि अभिनेता अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचे गत २७ मे रोजी निधन झाले. वीरू देवगण यांच्या निधनानंतर संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली. बॉलिवूडचे अनेक कलाकार अजय देवगण व कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी पोहोचले. अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, शाहरूख खान, सनी देओल असे अनेक कलाकार वीरू देवगण यांच्या अंत्यसंस्काराला हजर होते.

वीरू देवगण हे बच्चन कुटुंबाच्या अतिशय जवळ होते. त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी ऐकून अमिताभ बच्चन यांना प्रचंड धक्का बसला. आपल्या एका मित्राला गमावल्याचे दु:ख ते लपवू शकले नाहीत. त्याचमुळे वीरू देवगण यांच्या जळत्या चितेकडे बघत अमिताभ बराच वेळ नुसते बसून राहिले.

आपल्या ब्लॉगवर त्यांनी एक भावूक पोस्टही लिहिली.जळत्या चितेसमोर बसणं... अस्थी घेऊन जाण्याची वाट पाहणं... आपल्या जवळच्या व्यक्तीला लांब जाताना पाहणं... बाबा, आई.. पुन्हा एका नवीन दिवसाची सुरुवात आणि नवीन काम, असे त्यांनी लिहिले.

वीरू देवगण यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीबद्दलही त्यांनी लिहिले. त्यांनी लिहिले की, ‘मी पहिल्यांदा त्यांना राजस्थानच्या पोशीना या  लहानशा गावात भेटलो होतो. रेश्मा व शेरा या सिनेमाचे शूटींग सुरु होते. डमीसोबत ते एका अ‍ॅक्शन सीनची रिहर्सल करत होते. या सीनमध्ये सुनील दत्त लीड हिरो होते. मला आठवते की, राजस्थानच्या तापलेल्या वाळूत त्या सीनची तालीम करणे प्रचंड कठीण होते. त्यांच्या चेह-यावरच्या वेदना मला आजही आठवतात. पण ते सलग डमीसोबत सीनची तालीम करत राहिले. तेही परफेक्शनसह....आणि एकदिवस वीरू देवगण यांना आम्ही गमावले. वीरू देवगण सर्वोत्तम अ‍ॅक्शन डायरेक्टर होते. त्यांनी स्टंटमध्ये नावीण्य आणले. नवनवे प्रयोग केलेत. स्टंटमॅनसाठी नोक-या उपलब्ध करून दिल्यात. आज बॉलिवूडमध्ये अनेक स्टंटमॅन आहे. ही सगळी वीरू देवगण यांची देण आहे. वीरू यांचा मृत्यू माझ्यासाठी एक धक्का आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळली तेव्हा मी चेहरे सिनेमाच्या चित्रीकरणात होतो. मी काम थांबवले आणि संपूर्ण टीमसोबत दोन मिनिटांची श्रद्धांजली दिली.काम संपल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराला गेलो. तिथे पोहोचल्यावर अनेक गोष्टी आठवायला लागल्या... वेळ कसा निघून जातो कळत  नाही.. वेळ कधीच परत येत नाही. उरतात त्या फक्त आठवणी...’

टॅग्स :अमिताभ बच्चनअजय देवगण