Join us  

म्हणून तर तुमचा धंदा चालतो...! अमिताभ बच्चन यांची पोस्ट वाचून नेटकर्‍यांची सटकली

By रूपाली मुधोळकर | Published: November 08, 2020 1:42 PM

बिग बींनी लोकांना मारला टोमणा, असे मिळाले उत्तर

ठळक मुद्दे अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या त्यांच्याकडे अनेक प्रोजेक्ट आहेत.  

 अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो होस्ट करत आहेत. सोबत सोशल मीडियावरही अ‍ॅक्टिव्ह आहेत. यादरम्यान इन्स्टाग्रामवर त्यांनी एक फोटो शेअर केला. त्यांनी शेअर केलेला हा फोटो तर चाहत्यांना आवडला. पण या फोटोला अमिताभ यांनी दिलेले कॅप्शन पाहून लोक संतापले. मग काय यानंतर बिग बी सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल झालेत.

बिग बींनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवरचा स्वत:चा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. मात्र या फोटोसोबत त्यांनी लोकांना असा काही टोमणा मारला की, सगळेच हैराण झालेत. ‘एक बात तो तय है, इस दुनिया में लोगों के पास फुरसत बहुत है...,’ असे त्यांनी या फोटोसोबत लिहिले. सोबत स्माईल इमोजीही पोस्ट केले.

अमिताभ यांची ही पोस्ट वाचून अनेक युजर्सनी त्यांचा क्लास घेतला. आमच्याकडे वेळ आहे, म्हणून तर तुम्हा लोकांचा धंदा चालतो. आज तुम्ही श्रीमंत म्हणून मिरवता, ते आमच्या ‘फुर्सत’चीच देन आहे, अशा शब्दांत एका युजरने अमिताभ यांना सुनावले.

‘आम्ही रिकामटेकडे नसतो तर संपूर्ण बॉलिवूड रिकामटेकडे असते,’ अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने यावर दिली. काही युजर्सनी तर यावरून अमिताभ यांच्या कुटुंबालाही लक्ष्य केले. ‘बरोबर बोललात, आमच्याकडे खूप वेळ आहे. जसा अभिषेककडे आहे. ऐश्वर्या व तुमच्या पैशांवर जो जगतोय. काही लिहिण्याआधी स्वत:च्या घरात एकदा बघा,’ अशा शब्दांत या युजरने आपला संताप व्यक्त केला.  

 अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या त्यांच्याकडे अनेक प्रोजेक्ट आहेत.  अयान मुखर्जीच्या सुपरनॅच्युरल थ्रीलर ‘ब्रह्मास्त्र’ मध्ये ते दिसणार आहेत. यात त्यांच्यासोबत रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि मौनी रॉय आहे. तसेच नागराज मंजुळेसोबतचा त्यांचा ‘झुंड’ हा सिनेमाही तयार आहे.   दिग्दर्शक नाग अश्विनच्या सिनेमात बिग बींची एन्ट्री झाली आहे. अजून चित्रपटाचे टायटल ठरलेले नसले तरी या सिनेमाची जोरदार चर्चा आहे.  या आगामी सिनेमात प्रभास आणि दीपिका पादुकोण लीड रोलमध्ये आहेत. दीपिकाने या सिनेमासाठी 20 कोटी रूपये इतके मानधन घेतले आहे. तर प्रभासने तब्बल 100 कोटी. प्रभासच्या पाठोपाठ अमिताभ बच्चन या सिनेमातील दुसरे हायएस्ट पेड स्टार बनले आहेत. प्रभासनंतर सर्वाधिक मानधन अमिताभ यांना दिले गेले आहे आणि ही रक्कम दीपिकापेक्षा अधिक आहे.

बाबो ! अमिताभ बच्चन यांच्या सिनेमाचे दिग्दर्शन करणार अजय देवगण, डिसेंबरपासून सुरु करणार शूटिंग

‘मनुस्मृती’वरील प्रश्नावरून वाद ; अमिताभ बच्चन यांच्याविरोधात भाजपा आमदाराची पोलिसांत धाव 

टॅग्स :अमिताभ बच्चन