Join us  

अमिताभ बच्चन यांनी शोधून काढले सास-बहू मंदिर, हजारो वर्षापूर्वीचा आहे इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 4:38 PM

सास-बहू मंदिर सध्या सगळीकडे चर्चाचा विषय बनले आहे. स्टार प्लसवरील आगामी मालिका 'एक भ्रम- सर्व गुण सम्पन्न' मालिकेचे लाँचिंग सास-बहू मंदिरात झालं आणि सगळ्यांचे लक्ष या मंदिराकडे वेधले गेले. 

ठळक मुद्देअमिताभ बच्चन यांनाही या मंदिराने आकर्षित केले आहे1000 वर्ष जुन्या सास-बहु मंदिराचा शोध लावला

सास-बहू मंदिर सध्या सगळीकडे चर्चाचा विषय बनले आहे. स्टार प्लसवरील आगामी मालिका 'एक भ्रम- सर्व गुण सम्पन्न' मालिकेचे लाँचिंग सास-बहू मंदिरात झालं आणि सगळ्यांचे लक्ष या मंदिराकडे वेधले गेले. 

विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांनाही या मंदिराने आकर्षित केले आहे.  या मालिकेत मुख्य भूमिका साकारात असलेल्या जान्हवी मित्तल म्हणजे श्रेनु परिखने उदयपुरमध्ये असलेल्या सास-बहू मंदिरात आपल्या मालिकेचे लाँचिंग केले. 22 एप्रिल पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे लाँचिंग याठिकाणी करण्यामागचे खास कारण म्हणजे ही मालिका सासू-सुनेच्या नात्यावर आधारित आहे. मालिका लाँच झाल्यावर अमिताभ यांनी लगेचच याच सारख्या मध्यप्रदेशमध्ये असलेल्या 1000 वर्ष जुन्या सास-बहु मंदिराचा शोध लावला. यानंतर यामंदिरात संदर्भात अमिताभ बच्चन यांनी खुद्द ट्वीट केले आहे, हो, आपल्या पूर्वजांनी ग्वालियरमध्ये या दोन जुळ्या मंदिरांची निर्मिती केली होती. मी मोठ्या अभिमानाने भारतच्या नकाशावर याला पिन करतो आहे. मी सगळ्यांना #IndiaFound challeng मोहिमेत सहभागी होण्यास सांगतोय. 

वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर लवकरच बिग बी ब्रम्ह्यास्त्रमध्ये दिसणार आहेत. यात त्यांच्यासोबत रणबीर कपूर, आलिया भट्ट, मौनी राय आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत.' ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या निमित्ताने  आलिया आणि रणबीरची जोडी पहिल्यांदा  एकत्र दिसणार आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चनस्टार प्लस