Join us  

इतकी मोठी बातमी होईल, ठाऊक नव्हते...! अमिताभ बच्चन यांचे भावूक ट्वीट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 11:59 AM

प्रत्येक रविवारी बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी ‘जलसा’ बाहेर मोठी गर्दी जमते. या गर्दीला बिग बी कधीही नाराज करत नाही. मात्र काल रविवारी ‘जलसा’बाहेरची गर्दी काहीसी हिरमुसली.

ठळक मुद्देअमिताभ बच्चन यांची एक झलक पाहायला मिळावी म्हणून शेकडो चाहते दर रविवारी ‘जलसा’बाहेर ठाण मांडून बसतात

प्रत्येक रविवार आणि या प्रत्येक रविवारी ‘जलसा’ समोरची गर्दी, हा ‘सिलसिला गेल्या अनेक वर्षांपासून अखंड सुरु आहे. दर रविवारी बिग बी अमिताभ बच्चन हे आपल्या मुंबईतील ‘जलसा’ या बंगल्याबाहेर चाहत्यांना आवर्जून भेटतात. त्यांना अभिवादन करतात. प्रत्येक रविवारी बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी ‘जलसा’ बाहेर मोठी गर्दी जमते. या गर्दीला बिग बी कधीही नाराज करत नाही. मात्र काल रविवारी ‘जलसा’बाहेरची गर्दी काहीसी हिरमुसली. अमिताभ बच्चन यांची प्रकृती ठिक नसल्याने ते चाहत्यांना भेटू शकले नाहीत. अमिताभ यांनी ट्वीट करून याबद्दलची माहिती दिली. ‘आज संडे भेट घडू शकली नाही. प्रकृती काहीशी ठीक नाही. चिंता करण्याचे कारण नाही. पण बाहेर येण्यास असमर्थ आहे,’ असे ्त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले.अमिताभ यांचे हे ट्वीट चाहत्यांपर्यंत पोहोचले आणि अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला. चाहत्यांनी अमिताभ यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी प्रार्थना करणे सुरु केले. मीडियानेही ही बातमी ठळकपणे प्रकाशित केली. एक दिवस चाहत्यांना न भेटल्याची इतकी मोठी बातमी होईल, हे खुद्द अमिताभ यांनाही ठाऊक नव्हते. त्यामुळेच त्यांनाही आश्चर्य वाटले. सोमवारी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी या भावना व्यक्त केल्या.

‘ एका रविवारी  ‘जलसा’च्या बाहेर जमलेल्या चाहत्यांना न भेटल्याची इतकी मोठी बातमी होईल, याची मला कल्पना नव्हती. तुम्हा सर्वांना प्रेम, आदर, आभार,’असे ट्वीट त्यांनी केले.अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहायला मिळावी म्हणून शेकडो चाहते दर रविवारी ‘जलसा’बाहेर ठाण मांडून बसतात.अमिताभ याला ‘संडे दर्शन’ म्हणतात. मुंबईत असले की, दर रविवारी चाहत्यांना अभिवादन करायला बिग बी बाहेर येतात. हात हलवून चाहत्यांना अभिवादन करतात, त्यांचे आभार मानतात. गेल्या कित्येक वर्षांपासून हा ‘सिलसिला’ सुरू आहे. 

टॅग्स :अमिताभ बच्चन