असे म्हटले जात आहे की, चित्रपटाची कथा स्वातंत्र्याअगोदर ब्रिटिश काळातील ठगांवर आधारित आहे. हा चित्रपट मेडोव्स टेलर यांचे पुस्तक ‘कन्फेशन आॅफ ए ठग’ यावर आधारित आहे. चित्रपट २०१८ मध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रिलीज केला जाणार आहे. अशी चर्चा आहे की, कॅटरिना चित्रपटात तिच्या डान्सचा जलवा दाखविणार आहे. ती चित्रपटात एक आयटम नंबर करणार आहे. याव्यतिरिक्त मध्यंतरी अशीही चर्चा रंगली होती की, ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ जॉनी डेप यांच्या ‘पायरेट्स आॅफ कॅरेबियन’ या चित्रपटाच्या थीमवर आहे. मात्र या चर्चेवर आमिर खान यानेच पूर्णविराम दिला होता. आमिरने म्हटले होते की, शेकडो अॅक्शन एडवेंचर चित्रपट आहेत. ‘पायरेट्स आॅफ कॅरेबियन’, ‘इंडियाना जोन्स’ असे बरेचसे चित्रपट आहेत. हे सर्व चित्रपट अॅक्शन एडवेंचर आहेत. आमचा चित्रपटही एक अॅक्शन एडवेंचर आहे. मात्र या चित्रपटाची कथा एकदमच वेगळी आहे. शिवाय या चित्रपटातील पात्रही पूर्णत: वेगळे आहेत, असे त्याने म्हटले होते. आता आमिरचा हा चित्रपट काय करिष्मा दाखविणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच.}}}} ">T 2444 - Up and away to Malta for the 1st schedule of TOH .. Thugs of Hindostan .. Glory be .. !! pic.twitter.com/DEx4jHuLq5— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 3, 2017
‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’च्या शूटिंगसाठी अमिताभ बच्चन विदेशात रवाना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2017 21:00 IST
महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी विदेशात रवाना झाले आहेत. युरोप देशातील ‘माल्टा’ शहरात ...
‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’च्या शूटिंगसाठी अमिताभ बच्चन विदेशात रवाना!
महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी विदेशात रवाना झाले आहेत. युरोप देशातील ‘माल्टा’ शहरात शूटिंग केली जाणार आहे. शिवाय लवकरच आमिर खानही शूटिंगसाठी रवाना होणार असल्याचे समजते. अमिताभ त्यांच्या खासगी कारने विमानतळावर पोहोचले. पुढे तेथून व्हिआयपी प्लेनने युरोपकडे रवाना झाले. याविषयीची माहिती अमिताभ यांनीच त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून दिली आहे. शिवाय प्लेनमधील काही फोटोजही त्यांनी शेअर केले आहेत. ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या बहुचर्चित चित्रपटाचे विजय कृष्ण आचार्य हे दिग्दर्शन करीत आहेत, तर यशराज बॅनरअंतर्गत चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. चित्रपटात मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान आणि महानायक अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. पहिल्यांदाच हे दोघे सिल्व्हर स्क्रिनवर बघावयास मिळणार असल्याने चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटात अमिताभ आमिरच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. याव्यतिरिक्त अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि फातिमा सना शेख याही बघावयास मिळणार आहेत.