Join us  

बिग बींची नात अन् 'गली बॉय' फेम अभिनेत्याचा Video व्हायरल, गोव्याहून परतलं हे चर्चेतील कपल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2023 10:15 AM

बॉलिवूडच्या या स्टारकिड्समध्ये अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा मात्र वेगळी ठरते.

बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सची नेहमीच चर्चा असते. कधी पार्टी तर कधी कोणत्या इव्हेंटला हे स्टारकिड्स एकत्र दिसतात. अनन्या पांडे, जान्हवी कपूर, सारा अली खान सारख्या काही स्टारकिड्सने आता बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण केली आहे. तर नीसा देवगण, नव्या नवेली सारखे काही स्टारकिड्स अजूनही अभिनयापासून दूरच आहेत. 

बॉलिवूडच्या या स्टारकिड्समध्ये अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली (Navya Naveli Nanda) नंदा मात्र वेगळी ठरते. सामाजिक सेवा, महिलांचे विषय यावर नव्या काम करते. तिने तिचं छोटं स्टार्टअपही सुरु केलं आहे ज्यामाध्यमातून ती हे काम करते. आता सध्या नव्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. 'गली बॉय' फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi)आणि नव्या रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. नुकतेच दोघंही गोव्यावरुन परत आले असून त्यांचा विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल होतोय. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानी यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

व्हिडिओतून स्पष्ट दिसते की दोघंही अगदी हसतखेळत एकमेकांशी गप्पा मारत आहेत. मात्र विमानतळावरुन बाहेर आल्यानंतर दोघंही वेगवेगळे जातात.  ते नक्कीच रिलेशनशिपमध्ये आहेत असा अंदाज चाहते लावत आहेत. पण नव्याला दुसरा कोणी मिळाला नाही का असं म्हणत नेटकऱ्यांनी ट्रोलही केलं आहे. तर चाहत्यांना मात्र त्यांची जोडी आवडली आहे. अजून दोघांकडूनही रिलेशनशिपच्या चर्चांबद्दल अधिकृत दुजोरा आलेला नाही.

टॅग्स :नव्या नवेलीसिद्धांत चतुर्वेदीसोशल मीडिया