Join us  

महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर होताच बॉलिवूडकरांनी अशा शब्दांत दिल्या Reaction

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 11:02 AM

दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव करण्यात येणार म्हटल्यावर अमिताभ यांनी माझा आनंद हा शब्दांतही व्यक्त करता येणे अशक्य असल्याचे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल महानायक अमिताभ बच्चन यांना आजपर्यंत विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. मात्र त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. तो म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना गौरान्वित करण्यात येणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशाह महानायक अमिताभ बच्चन यांची निवड दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. नुकतीच केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली. ही बातमी समजताच  संपूर्ण देश तसेच देशाबाहेर असणारे अमिताभ यांचे चाहते देखील खूश झाले आहेत. 

त्यांना या पुरस्कारासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देताना दिसतात. सर्वसामान्यासोबत सेलिब्रेटीं मंडळीही ट्वीट करत अमिताभ बच्चन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तर दुसरीकडे खुद्द अमिताभ यांनी माझा आनंद हा शब्दांतही व्यक्त करता येणे अशक्य असल्याचे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

अभिषेक बच्चन

यात सगळ्यात आधी अभिषेक बच्चनने ट्वीट करत आपला आनंद व्यक्त केला. आज माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्याचबरोबर खूप अभिमान वाटतोय. तर दुसरीकडे अमिताभ यांची मुलगी श्वेता नंदानेही अमिताभ यांचा जुना फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

 रजनीकांत 

तर सुपरस्टार रजनीकांत यांनी  दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी अमिताभ बच्चन डिजर्व्ह करतात अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत. 

अनिल कपूर

अनिल कपूरने ट्वीट करत म्हटले आहे की, अमिताभ बच्चन यांच्याशिवाय भारतीय सिनेमा पूर्ण होऊच शकत नाही. आपल्या प्रत्येक भूमिकेने त्यांनी चित्रपटसृष्टीला आपले भरभरून योगदान दिले आहे. जे कधीच विसरू शकत नाही. त्यांनी दिलेल्या योगदानासाठी हा पुरस्कार त्यांच्यासाठी एक मोठा सन्मान आहे. तर आशा भोसले यांनी ही अमिताभ यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

करण जोहर

करण जोहरने म्हटले की,  भारतीय सिनेमासाठी प्रेरणादायी असणारे  महानायक अमिताभ  बच्चन हे ख-या अर्थाने लिजेंड आहेत.  त्यांचे काम पाहात मी घडलो खरंच खूप भाग्यवान समजतो स्वतःला . 

टॅग्स :अमिताभ बच्चन