Join us

अमिताभ बच्चन हॉस्पिटलमध्ये दाखल? यावर अभिषेक बच्चनने केला हा खुलासा

By तेजल गावडे | Updated: October 27, 2020 17:33 IST

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन रुग्णालयात दाखल असल्याचे वृत्त समोर आले होते. या वृत्ताचा खुलासा अभिषेक बच्चनने केला आहे.

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरे झाले. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या तब्येतीबद्दल नवीन वृत्त समोर आले. खरेतर नुकतेच सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांची तब्येत खराब झाल्याचे वृत्त व्हायरल झाले होते. बऱ्याचदा अशा व्हायरल बातम्यांमध्ये अजिबात तथ्य नसते आणि अशा वृत्तांमुळे चाहते चिंतेत पडतात. पुन्हा एकदा असेच काहीसे झाले आहे ज्यानंतर अभिषेक बच्चन याचे स्टेटमेंट समोर आले आहे.

नुकतेच असे वृत्त समोर आले आहे की कोणत्यातरी दुखापतीमुळे अमिताभ बच्चन यांना रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र हे वृत्त फोल ठरले आहे आणि कुणीतरी ही अफवा पसरवली होती. हे वृत्त समोर आल्यानंतर अभिषेक बच्चनने बॉलिवूड हंगामाशी बोलताना सांगितले की, माझे वडील माझ्या समोर बसले आहेत. ज्या व्यक्तीला तुम्ही हॉस्पिटलमध्ये पाहिले आहे तो त्यांच्यासारखा दिसणारा माणूस असेल. 

अमिताभ बच्चन यांनी अवयव दान करणार असल्याची घोषणा सोशल मीडियावर केली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर केला. ज्यात त्यांच्या कोटवर एक छोटेसे हिरव्या रंगाचे रिबन लावलेले दिसत आहे.

हा फोटो शेअर करत त्यांनी ट्विट केले की, मी शपथ घेतली आहे, मी अवयव दाता आहे. मी ग्रीन रिबन याच्या पावित्र्यासाठी परिधान केली आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चनअभिषेक बच्चन