Join us  

हेल्थ अपडेट : अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा, ‘त्या’ 26 लोकांचेही आले रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 12:21 PM

बच्चन कुटुंबातील चार सदस्य कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर 28 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. यापैकी 26 लोक हाय रिस्कवर होते.

ठळक मुद्देअमिताभ व अभिषेक कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर ऐश्वर्या राय आणि आराध्याची टेस्टदेखील पॉझिटीव्ह आली.  

कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर अमिताभ बच्चनअभिषेक बच्चन मुंबईच्या नानावटी रूग्णालयात भरती आहेत. रूग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक व अमिताभ दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. दोघेही उपचारांना प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे. ऐश्वर्या व तिची मुलगी आराध्या या दोघी सध्या होम क्वारंटाईनमध्ये आहेत.

एकूण 54 लोक बच्चन कुटुंबाच्या संपर्कात आले होते. बच्चन कुटुंबातील चार सदस्य कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर   28 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. यापैकी 26 लोक हाय रिस्कवर होते. या सर्व 26 लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. सर्वांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तथापि या सर्वांना पुढील 14 दिवसांपर्यंत क्वारंटाईन करण्यात आले आहे. बच्चन कुटुंबाचा स्टाफ कोरोना निगेटीव्ह आढळला आहे.

तूर्तास बिग बींचे सर्व चारही बंगले सील करण्यात आले आहेत. बीएमसीने या चारही बंगल्यांना कन्टेन्टमेंट झोन घोषित केले आहे. शनिवारी अमिताभ व अभिषेक यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. अमिताभ यांनी स्वत: सोशल मीडियावर ही माहिती दिली होती. अमिताभ व अभिषेक कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर ऐश्वर्या राय आणि आराध्याची टेस्टदेखील पॉझिटीव्ह आली.  यानंतर बच्चन कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची कोरोना टेस्ट केली गेली होती.  अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच अनेक कलाकारांनी रिट्विट करत त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना केली आहे. 

टॅग्स :अमिताभ बच्चनअभिषेक बच्चनकोरोना वायरस बातम्या