Join us

अमिताभ पुन्हा सुजित सरकारबरोबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 05:52 IST

बिग बी अमिताभ बच्चन यांनी सुजित सरकार प्रोडक्शनच्या एका चित्रपटासाठी सहमती दर्शविली आहे. सुजित आणि अमिताभ यांनी पिकूमध्ये एकत्र ...

बिग बी अमिताभ बच्चन यांनी सुजित सरकार प्रोडक्शनच्या एका चित्रपटासाठी सहमती दर्शविली आहे. सुजित आणि अमिताभ यांनी पिकूमध्ये एकत्र काम केले होते. आता ते सुजित निर्माता असलेल्या चित्रपटासाठी काम करणार आहेत. आम्ही अमिताभ बच्चन यांच्यासोबत नवा चित्रपट करणार असून, यासाठी अमिताभ बच्चन यांनी देखील सहमती दर्शविली आहे. अमिताभ यांच्यासोबत काम करणे हे आम्ही आमचे भाग्य समजतो. हा चित्रपट दिल्ली बेसवर आधारित आहे, असे सुजित यांनी चित्रपटाविषयी माहिती देताना म्हटले आहे. सुजित प्रोडक्शन हाउसतर्फे रायझिंग सन फिल्मस्कडून आम्ही हा चित्रपट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. चित्रपटाची स्क्रीप्ट निश्‍चित झाली असून, नव्याने पदार्पण केलेले अनिरुद्ध रॉय चौधरी हे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटासाठी फेब्रुवारीमध्ये चित्रीकरण सुरू होणार आहे.