Join us  

ट्रोलर्सला उत्तर देण्यासाठी अमिषा पटेलने पुन्हा शेअर केला बोल्ड फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 2:02 PM

चित्रपटात जरी झळकत नसली तरी, सोशल मीडियावर अभिनेत्री अमिषा पटेलची जोरदार चर्चा रंगत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती सातत्याने ...

चित्रपटात जरी झळकत नसली तरी, सोशल मीडियावर अभिनेत्री अमिषा पटेलची जोरदार चर्चा रंगत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती सातत्याने तिचे बोल्ड फोटो शेअर करीत असल्याने तिला सातत्याने ट्रोल केले जात आहे. ट्रोलर्सचा हा उद्धटपणा बघून अमिषाची सहनशीलता संपली असून, तिने ट्रोलर्सला रोखठोक उत्तर देण्यासाठी आणखी एक बोल्ड फोटो तिच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये ‘Redilicious’ असे लिहिले. वास्तविक हा शब्द कुठल्याही इंग्रजी डिक्शनरीमध्ये नाही. अमिषाने दिलेल्या कॅप्शनमधील हा शब्द पाहता तो इंग्रजीमधील ‘रिडिक्लस’ असावा ज्याचा अर्थ हास्यापद होतो, असे प्रथमदर्शनी दिसते. मात्र अमिषाने खूपच चतुरार्ईने तो ‘रेडिलीसियस’ असा लिहिला आहे. कदाचित त्याचा अर्थ फोटोमध्ये दिसत असलेला तिच्या लाल रंगाच्या ड्रेसशी संबंधित असावा. या ड्रेसमध्ये अमिषा खूपच बोल्ड अंदाजात बघावयास मिळत आहे. फोटोमध्ये तिच्या चेहºयावरील स्माइल घायाळ करणारी आहे. अमिषाने फोटोच्या कॅप्शनमध्ये लाल रंगाच्या तीन दिलच्या चिन्हांचाही वापर केला आहे. यावरून अमिषा हे सांगू इच्छित आहे की, तिला लाल रंग प्रचंड आवडतो. विशेष म्हणजे अमिषाची ही आवड यूजर्सलाही भावली असावी. कारण बहुतांश यूजर्सकडून तिच्या या फोटोचे कौतुकच केले जात आहे. मात्र काहींनी नेहमी प्रमाणे तिची फिरकी घेण्याचाही प्रयत्न केला. एका यूजरने अमिषाला चक्क कॅप्शनची स्पेलिंग शिकविण्याचा प्रयत्न केला. रितू गुप्ताने दु:ख व्यक्त करताना  ‘अरे देवा’ असे लिहिले. जीए रावलने लिहिले की, ‘तुला जे दाखवायचे ते सर्वांनीच बघितले आहे.’ एका यूजरने अमिषाच्या या फोटोला ‘डर्टी’ असे म्हटले.  बेन नावाच्या यूजरने तिला ‘कुरूप’ असे म्हटले. चंकी तैमुर कुंदर नावाच्या यूजरने ‘दादा इन ए साडी’ असे लिहिले. दरम्यान, या अगोदर अमिषाने तिच्या इन्स्टाग्रामवर बेडरूममधील एक अतिशय बोल्ड असा फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती टॉपलेस होताना दिसत होती. या फोटोवरून यूजर्सनी तिला चांगलेच धारेवर धरले होते. यूजर्सला उत्तर देण्यासाठीच अमिषाने हा नवा फोटो पोस्ट केला आहे.