Join us  

​पुन्हा एकदा इमरान खानच्या मदतीला येणार ‘मामू’ आमिर खान!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2018 6:06 AM

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा भाचा इमरान खान बॉलिवूडमधून पुरता गायब आहे. ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटानंतर त्याची साधी ...

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा भाचा इमरान खान बॉलिवूडमधून पुरता गायब आहे. ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटानंतर त्याची साधी झलकही मोठ्या पडद्यावर दिसलेली नाही. ‘कट्टी बट्टी’ आपटला नि आपटला इमरानचे नशीबचं जणू रूसून बसले. तेव्हापासून त्याच्या हाताला काम नाहीय. पण कदाचित येत्या दिवसांत इमरानचे नशीब फळफळण्याची शक्यता आहे. अर्थात याहीवेळी ‘मामू’ आमिर खान हाच इमरानच्या मदतीला धावून आला आहे. होय, ताजी खबर खरी मानाल तर आमिरने आपल्या या भाच्याला ‘महाभारत’ या चित्रपटात कास्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘महाभारत’ हा आमिरचा ड्रिम प्रोजेक्ट आहे, हे तर तुम्ही जाणताच. या ड्रिम प्रोजेक्टमध्ये इमरान दिसणार आहे. साहजिकच, असे झाले तर दीर्घ काळानंतर  एका यशस्वी चित्रपटाचा भाग बनण्याची संधी इमरानला मिळणार आहे. आता या संधीचे इमरान सोने कसे करतो, तेच बघायचे आहे.अभिनेता इमरान खान याने २००८ साली आलेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटापासून धमाकेदार सुरुवात केली होती. मात्र पहिल्या चित्रपटाव्यतिरिक्त त्याला फारसे यश मिळू शकले नाही. त्याचा शेवटचा चित्रपट ‘कट्टी बट्टी’त कंगना राणौतने मुख्य भूमिका केली होती. मध्यंतरी इमरान दिग्दर्शनाकडे वळणार, अशी खबर होती. पण अद्याप तरी तो या नव्या भूमिकेत दिसला नाही.  इमरानने अवंतिका मलिक हिच्याशी २०११ साली विवाह केला.  यानंतर २०१४ मध्ये त्यांची मुलगी इमाराचा जन्म झाला होता.ALSO READ : आमिर खानच्या ‘ड्रिम प्रोजेक्ट’मध्येही फातिमा सना शेख?महाभारतावर चित्रपट आणणे, हे आमिरचे स्वप्न आहे. या ड्रिम प्रोजेक्टबद्दल आमिर अलीकडे खूपदा बोलला आहे. चर्चा खरी मानाल तर आमिर व त्याच्या लेखकांच्या टीमने याची तयारीही सुरु केली आहे. पुण्याच्या लायब्ररीत असतील नसतील तितकी महाभारतावरील  पुस्तके आमिर व त्याची टीम वाचत सुटली आहे. आमिरचा हा ड्रिम प्रोजेक्ट सहा ते सात भागांत असेल, असेही कळतेय.  महाभारतावर चित्रपट हे माझे स्वप्न आहे. पण यासाठी मला माज्या आयुष्याची १५ ते २० वर्षे द्यावी लागतील, हे मी जाणतो आणि त्यामुळे हा प्रोजेक्ट हाती घेण्यास घाबरतो,  असे अलीकडे आमिर म्हणाला होता.