Join us

एमीला मिळाला ड्रीम रोल बॉलीवुड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:25 IST

बॉलीवुड अभिनेत्री एमी ज्ॉक्सन सध्या 'सिंग इज ब्लिंग' मुळे चर्चेत आहे. याअगोदर ती 'एक दिवाना था' मध्ये दिसली होती. ...

बॉलीवुड अभिनेत्री एमी ज्ॉक्सन सध्या 'सिंग इज ब्लिंग' मुळे चर्चेत आहे. याअगोदर ती 'एक दिवाना था' मध्ये दिसली होती. परंतु, एमी म्हणते की, ती नेहमी अँक्शन चित्रपट करणे पसंत करते. 'सिंग इज ब्लिंग' मध्ये तिला उत्तम संधी मिळाली आहे. एमी म्हणते की, ' मी नेहमीच अँक्शन चित्रपटात काम करणे पसंत करत होते. कारण, बॉलीवुडमध्ये फार क्वचित अभिनेत्री आहेत, ज्या अँक्शन चित्रपट करतात. 'सिंह इज ब्लिंग' मध्ये मला ड्रीम रोल मिळाला आहे. चित्रपट प्रमोशनदरम्यान एमी म्हणाली,' मी अँक्शन तर नेहमीच करू इच्छिते.