Join us  

तृप्ती डिमरीच्या बर्थडेसाठी कथित बॉयफ्रेंडची खास पोस्ट, अभिनेत्रीसोबत फ्लाइटमध्ये दिसला पोझ देताना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 1:20 PM

Tripti Dimri : अभिनेत्री तृप्ती डिमरी आज २३ फेब्रुवारीला ३०वा वाढदिवस साजरा करते आहे. या निमित्ताने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. त्यातील एका व्यक्तीच्या शुभेच्छांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे.

अॅनिमल फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी आज २३ फेब्रुवारीला ३०वा वाढदिवस साजरा करते आहे. या निमित्ताने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. त्यातील एका व्यक्तीच्या शुभेच्छांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. त्या व्यक्तीसोबत तृप्तीच्या रिलेशनशीपच्या सातत्याने चर्चा ऐकायला मिळत आहेत. हा व्यक्ती म्हणजे, अभिनेत्रीचा कथित बॉयफ्रेंड सॅम मर्चंट. त्याने तृप्तीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याने बर्थडे मेसेजही लिहिला आहे.

नॅशनल क्रश तृप्ती डिमरीच्या वाढदिवसानिमित्ताने सॅम मर्चंटने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यात तो तिच्यासोबत फ्लाइटमध्ये दिसतो आहे. या फोटोसोबत त्याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दोघे फोटोत खूप कॅज्युअल दिसत आहेत. 

बर्थडेलाही अभिनेत्रीने घेतला नाही ब्रेकईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, तृप्ती डिमरीने तिच्या बर्थडेलाही कामातून ब्रेक घेतला नाही. तिच्याकडे अनेक चित्रपट आहेत, ज्यामुळे तिच्या टाइट शेड्युलमुळे ती बर्थडेलाही काम करते आहे. ती राजकुमार रावसोबत विक्की और विद्या का वो वाला व्हिडीओ, विकी कौशलसोबत रोमँटिक कॉमेडी 'मेरे मेहबूब मेरे सनम' आणि कार्तिक आर्यनसोबत भूल भुलैया ३चा समावेश आहे. तृप्तीने करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सच्या आगामी प्रोजेक्टलाही होकार दिला आहे, ज्याचे शीर्षक अद्याप ठरलेलं नाही. 

टॅग्स :तृप्ती डिमरी