Join us

उडता पंजाबसाठी शाहिद कपूरला होकार द्यायला आलिया भट्टने घेतला एक वर्षांचा कालावधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 17:53 IST

गेल्या वर्षी आलिया भट्ट आणि शाहिद कपूर यांचा उडता पंजाब या चित्रपटांने प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळवले. भलेही बॉक्स ऑफिसवर ...

गेल्या वर्षी आलिया भट्ट आणि शाहिद कपूर यांचा उडता पंजाब या चित्रपटांने प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळवले. भलेही बॉक्स ऑफिसवर चित्रपट फारसा कमाल करु शकला नसला तरी शाहिद आणि आलियाच्या अभिनायाचे भरपूर कौतुक झाले. पंजाबी पॉप स्टारच्या भूमिकेत शाहिद कपूर दिसला होता तर एका बिहारी मुलीची भूमिकेत आलिया भट्टने सगळ्यांची मनं जिंकली होती. दोन्ही कलाकारांना याचित्रपटातील अभिनयासाठी अनेक अॅवॉर्ड्सदेखील मिळाले. आलियाने आपल्या भूमिकेच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. या भूमिकेसाठी तुम्ही आणखीन कोणत्या अभिनेत्रीच्या नावाचा विचाराच करु शकत नाही ऐवढा उत्तम अभिनय तिने केला होता. आलियाच्या भूमिकेला घेऊन नुकताच शाहिदने एक खुलासा केला जो आतापर्यंत कोणालाच माहिती नव्हता. मीडिया रिपोर्टनुसार शाहिद कपूरने सांगितले, ''मैरी जेनच्या भूमिकेसाठी आलिया भट्टचे नाव सगळ्यात पहिले माझ्याच डोक्यात आले आणि मीच तिचे नाव सूचवले होते.'' पुढे तो म्हणाला आलियाने उडता पंजाबमध्ये काम करण्यासाठी एक वर्ष वाट पाहायला लावली. त्यावेळी आलिया बॅक टू बॅक चित्रपट करत होती तिच्याकडे वेळ नव्हता. मात्र शाहिदने तिला हवा असणार वेळ दिला. त्यानंतर आलिया चित्रपटासाठी तयार झाली. तिच्या करिअरमधली ही सगळ्यात अवघड भूमिका असल्याचे आलियाने सांगितले. शाहिद आणि आलियानी 'शानदार'मध्ये ही स्क्रिन शेअर केली आहे. उडता पंजाबमधील त्यांच्यामधील केमिस्ट्री समीक्षकांना जास्तच भावली. सध्या आलिया तिच्या राजी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे तर शाहिद संजय लीला भंसालीच्या पद्मावतीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ALSO READ : OMG !! ​करिना कपूरबद्दल हे काय बोलून गेली आलिया भट्ट!