Join us

आलियाचा चार अभिनेत्यांसोबत रोमान्स?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 09:38 IST

गौरी शिंदे दिग्दर्शित आगामी चित्रपटात आलिया भट्ट आणि शाहरूख खान हे एकत्र दिसतील असे तुम्हाला माहिती होते. पण, तुम्हाला ...

गौरी शिंदे दिग्दर्शित आगामी चित्रपटात आलिया भट्ट आणि शाहरूख खान हे एकत्र दिसतील असे तुम्हाला माहिती होते. पण, तुम्हाला हे कुठे माहित आहे की, याच चित्रपटात आलिया आणखी चार अभिनेत्यांसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.आणि ते चार अभिनेते कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? ते आहेत अली जफर, कुणाल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि अंगद बेदी हे तिच्यासोबत दिसतील. हे चारही जण तिच्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहेत. आलिया एका निर्मार्तीचा अभिनय करत असून चार युवकांना ती भेटते जे वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेले असतात.अद्याप हे कळाले नाही की शाहरूख आणि आलियामध्ये रोमँटिक अँगल आहे की नाही? पण अजून तरी शाहरूख या चित्रपटाचा मुख्य भाग आहे. तो तिच्यासाठी प्रेरणा म्हणून या चित्रपटात काम करतो असे दाखवण्यात आले आहे.