आलिया म्हणते,‘त्याच्या डोळ्यांत स्वत:ला हरवते!’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 23:15 IST
आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि फवाद खान हे सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘कपूर अॅण्ड सन्स’ साठी प्रमोशन करण्यात व्यस्त ...
आलिया म्हणते,‘त्याच्या डोळ्यांत स्वत:ला हरवते!’
आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि फवाद खान हे सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘कपूर अॅण्ड सन्स’ साठी प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. दोन दिवसांवर चित्रपटाची रिलीज डेट येऊन ठेपली आहे. एका प्रमोशन इव्हेंटदरम्यान, आलिया त्याचा हँण्डसम को-स्टार सिद्धार्थ मल्होत्रा याचे कौतुक करताना बिल्कुल थकत नव्हती. ती म्हणते,‘ मी सिद सोबत काम करताना खुप कम्फर्टेबल असते. त्याच्यासोबत काम करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्याच्याबद्दलची वाईट गोष्ट एवढीच आहे की, तो खुपच हॉट आणि हॅण्डसम आहे. मी त्याच्या डोळयांत स्वत:ला विसरते. अभिनय करताना माझ्यासाठी मुख्य अडथळा त्याचे डोळेच आहेत.’ते दोघेही एकमेकांना डेट करतात अशा अफवा आहेत. पण त्यांनी कधीही सार्वजनिकपणे हे मान्य केलेले नाही. व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी ते दोघे गोव्याला गेले होते. मग आता आणखी काय सांगायचे बाकी राहिले आहे!source : koimoi.com