Join us

आलियाला मिळते श्रद्धाकडून प्रेरणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 11:52 IST

 सध्या बॉलीवूडमध्ये दोन अभिनेत्रींची एक्स्प्रेस एकदम सुसाट आहे. त्या म्हणजे श्रद्धा कपूर आणि आलिया भट्ट. या दोघींमध्ये शीतयुद्ध सुरू ...

 सध्या बॉलीवूडमध्ये दोन अभिनेत्रींची एक्स्प्रेस एकदम सुसाट आहे. त्या म्हणजे श्रद्धा कपूर आणि आलिया भट्ट. या दोघींमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याच्या चर्चा गरम आहेत. पण, आलिया म्हणते,‘मला श्रद्धा कपूरमुळे खुप प्रेरणा मिळते.‘बाघी’ चित्रपटाच्या सक्सेस बॅशमध्ये मी का थांबले नाही ? असे मला नेहमी विचारण्यात येते. पण, मला त्यादिवशी शूटींग होते. आणि मी तेवढं एकमेकांना समजू शकतो की, मी पार्टीत थांबू शकले नाही तर त्याचे श्रद्धाला नक्कीच वाईट वाटले नसणार.आम्ही एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखतो. मला श्रद्धाकडे पाहिल्यावर खुप प्रेरणा मिळते. तिच्यासारखं काम करण्याचा मी प्रयत्न करते. ’