Join us  

अश्विनी अय्यरच्या आगामी चित्रपटात आलिया भट्ट साकारणार 'ही' भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2018 5:50 AM

'राजी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोटींची उड्डाण घेतल्यानंतर आलिया भट्टचा करिअरचा ग्राफ देखील चांगलाचवर गेला आहे. 'राजी' चित्रपटात आलियाने साकारलेल्या ...

'राजी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोटींची उड्डाण घेतल्यानंतर आलिया भट्टचा करिअरचा ग्राफ देखील चांगलाचवर गेला आहे. 'राजी' चित्रपटात आलियाने साकारलेल्या सहमत या भूमिकेचे सर्वत्र कौतूक झाले. तिने या चित्रपटात एका गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. यानंतर आलिया आता आगामी चित्रपटात सिंगरची भूमिका साकारणार असल्याचे कळतेय. अश्विनी अय्यर तिवारी हिच्या आगामी चित्रपटात आलिया झळकणार असल्याचे आम्ही तुम्हाला या आधीच सांगितले होते. आता ती यात सिंगरची भूमिका साकारणार असल्याचे कळतेय. या चित्रपटाचे लेखन निखिल मल्होत्रा आणि अश्विनीचा पती नितेश तिवारी यांनी मिळून केले आहे.      हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, हा एक कॉमेडी चित्रपट असणार आहे. ज्यात तिचे सिंगर व्हायचे स्वप्न असते आणि ती ते जगते आणि पूर्णदेखील करते. काही दिवसांपूर्वी मुंबई मिररला दिलेल्या इंटरव्हु दरम्यान आलिया म्हणाली होती की, ''अश्विनीने के मजेशीर कॉन्सेप्ट मला दिले आहे. तिच्यासोबत काम करायला मी तयार आहे. अश्विनी एक खूपच चांगली दिग्दर्शिका आहे. या चित्रपटाला घेऊन मी खूपच उत्सुक आहे कारण काही गंभीर भूमिका केल्यानंतप मला काही तरी हलक-फुलक करायला मिळतेय.'' ALSO READ :  एकत्र जाहिराती करण्यास रणबीर-आलियाचा नकार! वाचा, काय आहे खरे कारण!!आलियाने 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया', 'उडता पंजाब' आणि 'ब्रदीनाथ की दुल्हनिया' या चित्रपटांमध्ये गाणं गायले आहे. मात्र पहिल्यांदाच ती सिल्वर स्क्रिनवर गायिकाची भूमिका साकारणार आहे. सध्या आलिया रणबीर कपूरसोबत 'ब्रह्रास्त्र'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. ब्रह्मास्त्र’  एक ट्रायोलॉजी चित्रपट आहे. म्हणजे, या चित्रपटाचे एकापाठोपाठ एक असे तीन भाग प्रदर्शित होणार आहेत. याच्या पहिल्या भागाचे शूटींग सुरू आहे. हा चित्रपट पुढीलवर्षी १५ आॅगस्टच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे तसेच ती अभिषेक वर्मनच्या मल्टी स्टारर कलंकमध्ये सुद्धा दिसणार आहे. आलिया तिच्या रणबीरकपूरसोबत असलेल्या अफेअरला घेऊन सुद्धा चर्चेत आहे.