Join us  

आलिया भटने रणबीर कपूरसोबतच्या रोका सेरेमनीच्या वृत्ताचे केले खंडन, लग्नाचा केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 8:12 PM

आलिया भट चित्रपटाव्यतिरिक्त रणबीर कपूरसोबत रिलेशनशीप असून त्याच्यासोबत लवकरच लग्नबेडीत अडकणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.

बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भट सध्या प्रोफेशनल व पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. नुकताच तिला 'राझी' चित्रपटासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तसेच लवकरच तिचा आगामी चित्रपट 'कलंक' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आलिया भट चित्रपटाव्यतिरिक्त रणबीर कपूरसोबत रिलेशनशीप असून त्याच्यासोबत लवकरच लग्नबेडीत अडकणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. ती लवकरच रणबीर बरोबर विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. इतकेच नाही तर एप्रिलमध्ये आलिया रणबीरसोबत रोका सेरेमनी करणार आहे. 

रणबीर कपूरसोबतच्या रोका सेरेमनीबाबत वृत्त आलियाने फेटाळून लावले आहे. तिने एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मी लंडनच्या एका रेस्टॉरंटमध्ये रोका सेरेमनीसाठी जाणार आहे. पण, ही रोका सेरेमनी माझी नाही. तुम्ही लोक वर्षभरात माझे लग्न लावून द्यायच्या का मागे लागले आहात? लग्न माझ्यासाठी दूरची गोष्ट आहे. सध्या मी कामाच्या व्यापात बिझी आहे. '

मी असे म्हणत नाही की फक्त काम करत राहणार आणि कधीच लग्न करणार नाही. मी लग्नासाठी खूप लहान आहे. लग्न करण्याचा माझा अजिबात विचार नाही. लग्न करण्याचा सध्या ट्रेंड चालू आहे. पण मी या ट्रेंडचा अजिबात हिस्सा नाही, असे आलियाने सांगितले. 

रणबीर कपूर सोबतच्या नात्याबद्दल आलिया भट म्हणाली की, 'जेव्हा मी रणबीरसोबत असते तेव्हा मला असे वाटते की चंद्र, तारे व आकाशात चालते आहे. मी त्याच्यासोबत रिलेशनशीपमध्ये नाही. आमच्यात फक्त मैत्री आहे. मी हे प्रामाणिकपणे आणि खरे सांगत आहे. ही खूप चांगली बाब आहे की आम्ही दोघे असे व्यक्ती आहोत जे आमचे प्रोफेशनल लाईफ खूप चांगल्यारित्या एन्जॉय करत आहे.'

सध्या आलिया भट व रणबीर कपूर 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. या चित्रपटाची निर्मिती अयान मुखर्जी करत आहेत. या चित्रपटात या दोघांव्यतिरिक्त अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भट