Join us

रणबीर कपूरसोबत नव्हे तर या व्यक्तीसोबत गेली डिनर डेटवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 17:11 IST

आलिया भट नुकतीच रणबीरसोबत नव्हे तर दुसऱ्याच एका व्यक्तीसोबत डिनर डेटला गेली होती. या डिनर डेटचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

ठळक मुद्देशाहीनने तिच्या सोशल मीडियावर आलिया आणि तिचा फोटो पोस्ट केला असून हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

सेलिब्रिटी कपल आलिया भट आणि रणबीर कपूर यांचे नाते आता कुणापासून लपलेले नाही. बर्‍याचदा हे दोघेही कुटूंब, मित्र आणि एकमेकांसमवेत हँग आऊट करताना दिसतात. दोघांच्या लग्नाचीही चर्चा पाहायला मिळतात. अनेकवेळा ते दोघे डिनर डेटवर देखील जाताना दिसतात. पण आलिया भट नुकतीच रणबीरसोबत नव्हे तर दुसऱ्याच एका व्यक्तीसोबत डिनर डेटला गेली होती. या डिनर डेटचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आलिया एका व्यक्तीसोबत डिनर डेटवर गेली होती आणि ती त्या व्यक्तीसोबत वेळ घालवायला मिळाल्याने खूपच खूश होती हे या फोटोंवरून आपल्याला दिसून येत आहे. ही व्यक्ती दुसरी कोणीही नसून आलिया भटची बहीण शाहीन भट आहे. शाहीनने तिच्या सोशल मीडियावर आलिया आणि तिचा फोटो पोस्ट केला असून हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर आलिया नुकतीच हैदराबादहून दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या आरआरआर सिनेमाचे शूटिंग पूर्ण करून परत आली आहे. यापूर्वी आलियाने संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटाचे शूटिंगही पुन्हा सुरू केले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आलियाची तब्येत बिघडल्यामुळे तिलाही एक दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

'गंगूबाई काठियावाडी' सिनेमात डॉन गंगूबाईची कथा दाखवण्यात आली आहे आणि चित्रपटात आलिया भट डॉनच्या भूमिकेत आहे. याशिवाय आलिया रणबीर कपूरसोबत 'ब्रह्मास्त्र' सिनेमात झळकणार आहे.

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर