आलिया भट्ट बनणार का अखिल अक्किनेनीची हिरोईन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 10:07 IST
बॉलिवूड गाजवल्यानंतर चुलबुली आलिया भट्ट दाक्षिणात्य चित्रपटांत दिसली तर नवल वाटायला नको. होय, कारण टॉलिवूडचा सुपरस्टार अक्कीनेनी नागार्जुन याचा ...
आलिया भट्ट बनणार का अखिल अक्किनेनीची हिरोईन?
बॉलिवूड गाजवल्यानंतर चुलबुली आलिया भट्ट दाक्षिणात्य चित्रपटांत दिसली तर नवल वाटायला नको. होय, कारण टॉलिवूडचा सुपरस्टार अक्कीनेनी नागार्जुन याचा हँडसम आणि यंग मुलगा अखिल अक्कीनेनी याला त्याच्या दुसºया चित्रपटासाठी तेवढीच यंग आणि ब्युटिफुल हिरोईन हवी आहे आणि ही हिरोईन आहे, आलिया भट्ट.खरे तर या चित्रपटासाठी फिमेल लीड म्हणून मेघा आकाश हिला साईन करण्यात आले होते. पण कदाचित मेघा आकाशचा हा चित्रपट करण्यात फारसा इंटरेस्ट राहिलेला नाही. एका मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे काम सुरु करण्याआधीच मेघाने दुसºया प्रोजेक्टवर काम करणे सुरु केले. केवळ एवढेच नाही तर दुस-या प्रोजेक्टच्या शूटींगसाठी ती महिनाभरासाठी अमेरिकेत पोहोचली. दुसºया शब्दांत सांगायचे तर मेघामुळे अखिलच्या चित्रपटाचे पुरते खोबरे झाले. अर्थात हार मानेल तो अखिल कुठला. मेघा नाही तर आता आलियाला घेऊन हा चित्रपट पूर्ण करू, असे त्याच्या मनाने घेतले. आपल्या या चित्रपटासाठी बॉलिवूड ब्युटी आलिया भट्ट हिच हिरोईन आता त्याला हवी आहे. यासाठी अखिल व त्याचे वडिल नागार्जुन या दोघांनी जोराचे प्रयत्न सुरु केले असल्याचे कळतेय.अद्याप आलियाने या चित्रपटासाठी होकार दिलेला नाही. तूर्तास तरी अखिल व नागार्जुना यांनी करण जोहर व आलियाचे पिता महेश भट्ट यांच्यामार्फत फिल्डिंग लावली आहे. महेश भट्ट व नागार्जुन चांगले मित्र आहेत. याचाही काही फायदा होईल, असे अखिलला वाटतेय. आता सगळे काही ठीक राहिले तर लवकरच आलिया व अखिल अशी जोडी टॉलिवूडमध्ये धूम करेल, यात शंका नाही. होय ना?