Join us  

'मिस्टर इंडिया'च्या फिमेल व्हर्जनचे नाव ठरले, अली अब्बास कतरिना केफसोबत लवकरच सुरु करणार शूटिंग

By गीतांजली | Published: December 08, 2020 6:00 PM

हा सिनेमा 'मिस्टर इंडियावर'वर आधारित असेल.

अभिनेता सलमान खानच्या 'सुलतान', 'टायगर जिंदा है', 'भारत' सारख्या सिनेमांचे दिग्दर्शन करणारा दिग्दर्शक अली अब्बास जफरच्या आगामी सिनेमातील  अडथळे हळू हळू दूर होताना दिसू लागले आहेत. अब्बासने यापूर्वीच या सिनेमासाठी कतरिना कैफची निवड केली आहे. अलीला शूट करण्यासाठी जागा मिळाली आहे. अली अब्बासने सिनेमाचे नावदेखील नक्की केले आहे.

अली अब्बासच्या सुपरहिरो सिनेमाचे कथानक अनिल कपूर यांच्या हिट सिनेमा 'मिस्टर इंडियावर' आधारित असेल. सिनेमाचे हक्क आधीपासूनच बोनी कपूर यांच्याकडून झी ग्रुपने विकत घेतले आहेत. अली अब्बासचा हा सिनेमा देशातील असा पहिला सुपरहिरो सिनेमा असेल ज्यामध्ये मुख्य पात्र अभिनेत्रीची भूमिका साकारेल.

अली या सिनेमावर बर्‍याच दिवसांपासून काम करतो आहे आणि त्याने नुकतेच स्क्रिप्ट पूर्ण केले. सप्टेंबर महिन्यात तो  दुबईला देखील गेला आणि चित्रपटाच्या शूटिंगसाठी एक जागाही पाहिली.  अलीने या सिनेमाचे नाव 'सुपर सोल्जर' ठेवले आहे. अशी माहिती आहे की अली या सिनेमाचे शूटिंग अबू धाबी, दुबई, पोलंड, जॉर्जिया आणि उत्तराखंडमध्ये करणार आहे.  एका मुलाखती दरम्यान अली अब्बासने सांगितले आहे की, त्याच्या सिनेमात हिरो नाही आहे.

 'सुपर सोल्जर' हा सिनमा फीमेल सुपरहीरोवर आधारित असेल आणि प्रेमाशी तिचा काही संबंध नसेल. सिनेमात कतरिना कैफचे बरेच ऍक्शन सीक्वेन्सही असतील, म्हणून तिने मार्शल आर्ट्स शिकण्यास सुरूवात केली आहे. अलीला त्याच्या सिनेमासाठी निर्मात शोधणे कठीण झाले होते. वास्तविक, स्त्री प्रधान सिनेमा आतापर्यंत देशात फारसा चांगला व्यवसाय करताना दिसला नाही.  कंगना रनौतच्या 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' सारखा चित्रपटदेखील निर्मात्यांना अपेक्षित नफा देऊ शकला नव्हता.

 मिळालेल्या माहितीनुसार, कतरिना आधी ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबत तिच्या 'फोन भूत' सिनेमाचे शूटिंग पूर्ण करणार आहे. त्यानंतर ती सलमान खानसमवेत यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली 'टायगर ३' करणार आहे. त्यानंतरच कॅट अली अब्बास तिची डेट्स देणार आहे. अली अब्बाससोबत कतरिनाचा हा चौथा सिनेमा असेल.  यापूर्वी तिने अली अब्बासबरोबर 'मेरे ब्रदर की दुल्हन', 'टायगर जिंदा है' आणि 'भारत' मध्ये काम केले आहे.

टॅग्स :कतरिना कैफ