अक्षयने शेअर केला ‘टॉयलेट’चा पहिला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2016 16:21 IST
बॉलिवूड स्टार अक्षय कुमारने त्याचा आगामी विनोदी चित्रपट ‘टॉयलेट-एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो ...
अक्षयने शेअर केला ‘टॉयलेट’चा पहिला फोटो
बॉलिवूड स्टार अक्षय कुमारने त्याचा आगामी विनोदी चित्रपट ‘टॉयलेट-एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो चित्रपटाच्या सेटवरचा असल्याचे सांगण्यात येते. हा फोटो चित्रपटाच्या नावाप्रमाणेच टॉयलेटचा आहे हे विशेष. नीरज पांडे दिग्दर्शित ‘टॉयलेट-एक प्रेम कथा’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. शूटिंगसाठी अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री भूमी पेडणेकर यांच्यासह संपूर्ण क्रू हा नंदगाव या ठिकाणी पोहोचला. सुमारे २० दिवस चालणाºया ‘टॉयलेट’च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. शूटिंगच्या पहिल्या दिवसाची सुरूवात करताना अक्षय कुमारने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो अभिनेत्री भूमी पेडणेकरसोबत उभा आहे. या फोटोमध्ये त्याच्या मागच्या बाजूला एक ‘टॉयलेट’ दिसत असून ते फार चांगल्या अवस्थेत नाही. या फोटोवर अक्षयने कमेंट केले आहे. तो म्हणतो, सुप्रभात, मी आणि भूमी ‘टॉयलेट -एक प्रेम कथा’च्या सेटचा फोटो शेअर करीत आहोत. आज शूटिंगचा पहिला दिवस आहे. आम्हाला तुमच्या शुभेच्छा हव्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय कुमार २० दिवसांपर्यंत नंदगावमध्ये शूटिंग करणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीत हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार असून, या चित्रपटाची शूटिंग संपल्यावर पोस्ट प्रोेडक्शनच्या कामाला लगेच सुरुवात केली जाणार आहे. ‘टॉयलेट -एक प्रेम कथा’ हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला समर्थन करणार आहे. या चित्रपटातून स्वच्छता न राखणाºयांवर विनोदाच्या माध्यमातून टीका करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी हे भारतीयांना स्वच्छतेप्रती जागरुक करीत असतानाच यात आता त्यांना अक्षयची अप्रत्यक्षपणे साथ मिळणार असल्याचे दिसते.