Join us

​ट्विंकल नव्हे तर ही आहे अक्षय कुमारची बेस्ट फ्रेंड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2017 19:57 IST

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा जॉली एलएलबी २ या चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाली आहे. यामुळे तो आनंदी आहेत. तसाही सदैव ...

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा जॉली एलएलबी २ या चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाली आहे. यामुळे तो आनंदी आहेत. तसाही सदैव आनंदी असणारा अक्षय कुमार आपल्या आनंदाचे श्रेय पत्नी ट्विंकल खन्ना हिला देतो. दोघांमधील प्रेम लपलेले नाहीच. मात्र, त्याची बेस्ट फ्रें ड कोण असा प्रश्न विचारल्यावर त्याने ट्विंकलचे नव्हे तर दुसºयाच महिलेचे नाव सांगितले. मागील काही दिवसांपासून ‘जॉली एलएलबी २’च्या प्रमोशनात व्यस्त असलेल्या अक्षयने या दरम्यान ट्विटरवर आपल्या चाहत्यांशी लाईव्ह चॅट केले. यात त्याने अनेक प्रश्नाची उत्तरे दिली. एका चाहत्याने त्याला तुझी बॉलिवूडमधील बेस्ट फ्रे ंड कोण असा प्रश्न विचारला. यावर त्याने दिलेल्या उत्तराचे सर्वांना आश्चर्य वाटले. अक्षय याने आपली बेस्ट फ्रेंड म्हणून डिंपल कपाडियाचे नावे घेतले. अक्षय म्हणला, माझी मदर इन लॉ, म्हणजेच डिंपल कपाडिया. अक्षय कुमार आपल्या कुुटुंबाच्या अतिशय जवळ मानला जातो. आपल्या व्यस्त शूटिंग शेड्युल मधूनही कुटुंबासाठी वेळ काढण्याचा त्याचा प्रयत्न असतो. आपली बेस्ट फ्रेंड म्हणून डिंपल कपाडिया हिचे नाव घेतल्याचा अर्थ असा की तो आपली पत्नी ट्विंकल व मुलांच्या जेवढा जवळ आहे तेवढाच तो आपल्या सासूला देखील मान देतो.  डिंपल कपाडियासोबतचा एक फोटो देखील त्याने ट्विटरवर शेअर केला आहे. डिंपल कपाडिया ही आपल्या जमान्यातील आघाडीची अभिनेत्री होती. बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे राजेश खन्नासोबत डिंपलने लग्न केले. तर राजेश खन्ना यांचा बंगला अक्षयने विकत घेतला असून सध्या तो तेथेच आपल्या कुटुंबासोबत राहतो.