Join us  

अफेअर, साखरपुडा अन् धोका! आता २० वर्षांनी रवीनासोबत काम करण्यावर अक्षय कुमारने सोडलं मौन, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 4:34 PM

२० वर्षांनंतर रवीना टंडनबरोबर काम करण्याबाबत अक्षय कुमारने केलं भाष्य, म्हणाला...

बॉलिवूड सेलिब्रिटींची लव्ह लाइफ, त्यांचे अफेअर हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. काही कलाकार त्यांच्या बॉलिवूडमधील करिअरपेक्षा अफेअर्समुळे प्रसिद्धीझोतात आले होते.  बॉलिवूडमध्ये गाजलेल्या अफेअर्सपैकी एक म्हणजे अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचं अफेअर. अक्षय-रवीना ही ९०च्या काळातील बॉलिवूडमधील हिट जोडी होती. १९९६ साली प्रदर्शित झालेल्या 'मोहरा' चित्रपटात त्यांनी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर 'खिलाडियो का खिलाडी', 'मे खिलाडी तू अनारी', 'पोलीस फोर्स', 'किमत', 'बारुद' अशा अनेक चित्रपटांत त्यांनी एकत्र काम केलं. पण, त्यानंतर जवळपास २० वर्ष ते एकत्र काम करताना दिसले नाहीत. आता 'वेलकम ३'च्या निमित्ताने ते पुन्हा एकत्र दिसणार आहेत. 

२० वर्षांनंतर रवीना टंडनबरोबर काम करण्यावर अक्षय कुमारने भाष्य केलं आहे. 'एएनआय'ला दिलेल्या मुलाखतीत खिलाडी कुमार म्हणाला, "वेलकम टू द जंगल या चित्रपटात आम्ही एकत्र काम करत आहोत. लवकरच या चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार आहे. आम्ही दोघांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. ते चित्रपट सुपरहिटही झाले. आता अनेक वर्षांनंतर आम्ही पुन्हा स्क्रीनवर एकत्र दिसणार आहोत." 

अक्षय कुमारबरोबर काम करण्यावर रवीनानेही मौन सोडलं होतं. "आमच्या दोघांची जोडी हिट होती. मोहरानंतरही आम्ही अनेक चित्रपट हिट झाले. आम्ही बोलतो आणि कधीकधी भेटतोदेखील. सगळेच त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. आजच्या काळात तर मुली कॉलेजमध्ये बॉयफ्रेंडही बदलतात. घटस्फोटही होत आहेत. अशात एक साखरपुडा मोडला, तर लोक ते का विसरू शकत नाहीत? ही कोणतीही मोठी गोष्ट नाही," असं रवीना म्हणाली होती. 

'मोहरा' चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा अक्षय आणि रवीना भेटले होते. तेव्हाच त्यांच्यातील प्रेमसंबंध फुलले होते. त्यांच्या अफेअरची प्रचंड चर्चा रंगली होती. त्यांनी गुपचूप साखरपुडाही उरकला होता. पण, त्यानंतर त्यांच्यात ब्रेकअप झालं. त्यानंतर अक्षय कुमार ट्विंकल खन्नाबरोबर रिलेशनशिपमध्ये होता. काही वर्षांनंतर त्यांनी लग्नही केलं. 

टॅग्स :अक्षय कुमाररवीना टंडन