Join us  

 अक्षय कुमारचा मुलगा आरवला का आवडत नाही क्रिकेट? का करतो तिरस्कार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 10:57 AM

क्रिकेटची पंढरी समजल्या जाणा-या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर काल विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रंगला. इंग्लंड आणि न्यूझीलंडदरम्यान झालेला हा सामना पाहण्यासाठी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पोहोचला होता.

ठळक मुद्देअक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास सध्या तो मिशन मंगल आणि सूर्यवंशी या चित्रपटात बिझी आहे.

क्रिकेटची पंढरी समजल्या जाणा-या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर काल विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रंगला. इंग्लंड आणि न्यूझीलंडदरम्यान झालेला हा  सामना पाहण्यासाठी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पोहोचला होता. यादरम्यान अक्षय  सौरव गांगुली व हरभजन सिंग यांच्यासोबत  गप्पा मारताना दिसला. यावेळी अक्कीने अनेक आठवणी शेअर केल्यात. माझा मुलगा आरव याला क्रिकेट अजिबात आवडत नाही, हा मोठा खुलासाही त्याने केला. शिवाय यामागचे कारणही सांगितले.

आरव क्रिकेटचा तिरस्कार करतो. मी सतत क्रिकेट पाहत असतो, म्हणून तो या खेळाचा तिरस्कार करतो. पण माझी मुलगी नितारा हिला मात्र क्रिकेट फार आवडते. ती माझ्यासोबत क्रिकेट एन्जॉय करते, असे अक्षयने यावेळी सांगितले. शाळेत असतानाचा एक किस्साही त्याने ऐकवला. मी शाळेत असताना खूप क्रिकेट खेळायचो. खेळाडूंना त्यांच्या बॉलिंग व बॅटिंग स्किलमुळे निवडले जाते. पण मला माझ्या फिल्डिंग स्किलमुळे टीममध्ये घेतले जायचे, असे त्याने सांगितले.

2011च्या विश्वचषक सामन्यातील एक आठवणही त्याने सांगितली.  2011च्या विश्वचषक सामन्यात एम.एस. धोनीने मारलेला षटकार मला अजूनही आठवतोय. त्याने मारलेला बॉल तिथे स्टँडमध्ये बसलेल्या माझ्या एका मित्राने झेलला होता. मित्राने मला तो बॉलसुद्धा दाखवला होता आणि माझ्यासाठी ती एक खास आठवण होती, असे त्याने सांगितले.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास सध्या तो मिशन मंगल आणि सूर्यवंशी या चित्रपटात बिझी आहे. याशिवाय साऊथचा सुपरहिट चित्रपट ‘कंचना’चा  हिंदी रिमेक ‘लक्ष्मी बॉम्ब’मध्येही त्याची वर्णी लागली आहे. ‘गुड न्यूज’ आणि ‘हाऊसफुल 4’ या चित्रपटातही तो झळकणार आहे. ‘मिशन मंगल’ येत्या 15 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन, तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहेत.

टॅग्स :अक्षय कुमारवर्ल्ड कप 2019